'राजगृह' तोडफोड प्रकरणी आरोपीला अटक, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

'राजगृह' तोडफोड प्रकरणी आरोपीला अटक, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतलं होतं.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी 7 जुलैला हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतलं होतं. अधिक तपास केला असता सीसीटिव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयीत आरोपीच मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं.

आज दुपारी पोलिसांनी उमेश जाधव याला अटक केली. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.

पुण्यात कोरोना व्यक्तीलाच लुटलं, रुग्णालयातून शिफ्ट करण्यासाठी घेतले तब्बल...!

दरम्यान, 'राजगृह'वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली होती. एवढंच नाही तर माथेफिरूंनी घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले.

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, अशी आहे आजची आकडेवारी

उद्धव ठाकरे संतापले, पोलिसांना दिले कठोर आदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'च्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 9, 2020, 10:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading