मंगळवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर जाऊन तोडफोड केली. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली तर कुंड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं. एवढंच नाहीतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याही तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचे अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राजगृहावर दोन व्यक्ती आले होते ही गोष्ट खरी आहे. या दोन व्यक्तींनी नासधूस केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्याचा प्रयत्नही केला. राजगृहावर सर्व पोलीस आणि अधिकारी पोहोचले असून चौकशी सुरू आहे, पोलिसांनी अत्यंत चोख काम केले आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. तसंच, या प्रकरणी सर्व जनतेनं शांतता राखली पाहिजे. राजगृहाच्या आजूबाजूला गर्दी करू नका, अशी विनंतीही आंबेडकर यांनी केली. दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल - गृहमंत्री दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून -अजित पवार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरू केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.... अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. (2/2)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर