करण जोहरला राग अनावर; कार्तिक आयर्नला फ्रेंडलिस्टमधून केलं डिलिट

करण जोहरला राग अनावर; कार्तिक आयर्नला फ्रेंडलिस्टमधून केलं डिलिट

यामुळं दोन्ही कलाकारांमधील संबंध ताणले गेले आहेत. शिवाय करण इतका संतापलाय की त्यानं कार्तिकला आपल्या फ्रेंड लिस्टमधून देखील बाहेर काढलं आहे.

  • Share this:

मुंबई 17 एप्रिल: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) येत्या काळात ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) या चित्रपटात झळकणार होता. परंतु करण जोहरसोबत (Karan Johar) झालेल्या अंतर्गत मतभेदांमुळं त्याला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळं धर्मा प्रोडक्शननं घेतलेल्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच काय तर कार्तिकसोबत त्यानं आपली मैत्री देखील तोडून टाकली असंही म्हटलं जात आहे. अर्थात या चर्चेत काही प्रमाणात सत्यता असल्याचं दिसत आहे. कारण त्यानं कार्तिकला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

कार्तिक गेली दोन वर्ष दोस्ताना या चित्रपटामुळं चर्चेत होता. या चित्रपटासाठी त्यानं 20 दिवसांचं शूटिंग देखील केलं होतं. परंतु काही समिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं इतर चित्रपटांसाठी दोस्तानाचं चित्रीकरण थांबवलं. शिवाय पटकथेत त्याला काही बदल हवे होते. अन् ते बदल करण्यास दिग्दर्शक तयार नव्हते. त्यामुळं करण आणि कार्तिकमध्ये मतभेद झाले. अन् अखेर चित्रपटातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अर्थात हा निर्णय व्यवसायिक असला तरी यामुळं दोन्ही कलाकारांमधील संबंध ताणले गेले आहेत. शिवाय करण इतका संतापलाय की त्यानं कार्तिकला आपल्या फ्रेंड लिस्टमधून देखील बाहेर काढलं आहे.

अवश्य पाहा - राजकुमार राव की विकी कौशल; करणच्या ‘दोस्ताना 2’मध्ये लागणार कोणाची वर्णी?

2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अमृतसर येथे चित्रीकरण करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दोस्ताना 2’ हा 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 17, 2021, 3:50 PM IST

ताज्या बातम्या