तुला रोज सेक्स करावा वाटत नाही का? महिला पायलटला विचारला प्रश्न

तुला रोज सेक्स करावा वाटत नाही का? महिला पायलटला विचारला प्रश्न

एअर इंडियातील एका महिला पायलट वरिष्ठ कॅप्टनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे: एअर इंडियातील एका महिला पायलट वरिष्ठ कॅप्टनवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिलेल्या तक्रारीनंतर कॅप्टनची चौकशी सुरू असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. या कॅप्टनने महिलेला काही अयोग्य प्रश्न विचारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हैदराबादमधील एक हॉटेलमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर संबंधित कॅप्टनने जेवणाला सोबत येण्याची ऑफर दिली. या कॅप्टन सोबत अनेक वेळा विमान प्रवासात सहकारी म्हणून काम केल्यामुळे पीडित महिला पायलट त्याच्या सोबत जेवण करण्यास गेली. रात्री आठच्या सुमारास आम्ही जेवणासाठी गेलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी विचित्रपणा सुरू केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

कॅप्टनने सुरुवातीला स्वत:च्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितले. मी माझ्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाही. मी निराश आणि दु:खी आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. तुझ्या पतीस सोबत कशी राहतेस. तुला रोज सेक्स करावा वाटत नाही का? असे चुकीचे प्रश्न त्यांनी विचारले. यावर मला अशा गोष्टींवर बोलायचे नाही, असे सांगत मी कॅब बुक केल्याचे त्या पायलट महिलेने सांगितले.

या प्रकरणी एअर इंडियाने संबंधित वरिष्ठ कॅप्टनची चौकशी सुरु केली आहे.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 15, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading