Home /News /news /

घरी आणि ऑफिसमध्ये AC अजिबातच लावू नका, मुख्यमंत्र्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

घरी आणि ऑफिसमध्ये AC अजिबातच लावू नका, मुख्यमंत्र्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला

कोरोनावर मात करून आपण विजयाची गुढी उभारू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    मुंबई, 25 मार्च : देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 582वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक म्हणजे 112 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अशात आज देशभरात गु़ढीपाडव्याचा सण आहे. पण तरीदेखील कोणीही बाहेर पडू नका. कोरोनावर मात करून आपण विजयाची गुढी उभारू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी आजच्या दिनी नागरिकांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे कोणीही घरात एसी लावू नका असा असे आदेश केंद्र सरकारकडून आले असल्याचं उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आलं आहे. आमच्याही घरात हवा आहे. चला हवा येऊ द्या असं म्हणत कोणीही घरात एसी लावू नये घरात हवा खेळती ठेवा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 'चला हवा येऊ द्या'  कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात त्यामुळे हे विषाणू अशा वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे एसीचा वापर कमी करावा. घरीही शक्यतो दारं खिडक्या उघडे ठेवावेत. शक्यतो पंख्याचा वापर करावा. उन्हामध्ये विषाणूची ताकद कमी होते त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. घरात सूर्यप्रकार येऊ द्यावा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातही एसीचं कुलिंग कमी ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. एसी सुरू असल्यावर आपण घरातील वेंटिलेशनचे सर्व मार्ग बंद करतो ऑल इंडिया इन्स्टिट्टुयट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, 'गरमीमुळे कोरोनाव्हायरस निष्क्रिय होईल, याचे काही पुरावे नाहीत. मात्र गरमी वाढते, तशी लोकं एसीचा वापर जास्त करतात. यामुळे घरातील तापमान कमी होतं आणि घरात आधीपासूनच असलेला व्हायरस पुन्हा सक्रिय होतो. असं वातावरण व्हायरससाठी अनुकूल होतं कारण एसी सुरू असल्यावर आपण घरातील वेंटिलेशनचे सर्व मार्ग बंद करतो, ज्यामुळे हवा खेळती राहत नाही. घरात दमटपणा वाढतो' थंड ठिकाणी व्हायरस तग धरू शकतो तज्ज्ञांच्या मते, थंड ठिकाणी व्हायरस तग धरू शकतो. यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झपाट्याने परू शकतो. ज्या घरात वेंटिलेशनची व्यवस्था चांगली नाही, ती जागा व्हायरससाठी सर्वात चांगली ठरते. त्यामुळे सिंगापूर सरकारनेही लोकांना एसी बंद करून पंख्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय भारतीय रेल्वेने एसी लोकलमध्ये काही मानकं ठरवलीत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या