Home /News /news /

तिरुपतीला भक्तांनी केलं 200 पट अधिक दान, कोरोना काळातही तिरुपतीत भक्तांचा ओघ

तिरुपतीला भक्तांनी केलं 200 पट अधिक दान, कोरोना काळातही तिरुपतीत भक्तांचा ओघ

जून महिन्यात दर दिवशी सरासरी 15 ते 18 हजार नागरिकांनी तिरुपतीचं दर्शन घेतलं असून मे महिन्याच्या तुलनेत जमा झालेल्या दानाचा आकडा हा तब्बल 200 पटींनी वाढला आहे.

    तिरुमाला, 4 जुलै : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंशतः लॉकडाऊनची (Lockdown) स्थिती असताना आणि आंतरराज्यीय प्रवासावर (Intra state travel) मर्यादा असतानादेखील तिरुपतीला (Tirupati) जाणाऱ्या भक्तांचा उत्साह कायम राहिल्याचं दिसून आलं आहे. जून (June) महिन्यात दर दिवशी सरासरी 15 ते 18 हजार नागरिकांनी तिरुपतीचं दर्शन घेतलं असून मे महिन्याच्या तुलनेत जमा झालेल्या दानाचा आकडा हा तब्बल 200 टक्के वाढला आहे. जून महिन्यात साधारण 4 लाख 14 हजार भक्तांनी मिळून 36 कोटी रुपयांचं दान केल्याची आकडी देवस्थान समितीकडून जाहीर करण्यात आली आहे. तिरुपतीला साधारण दर दिवशी 2 ते 3 कोटी रुपये दान केले जातात. एखाद्या सणाच्या दिवशी हेच प्रमाण वाढून 5 ते 7 कोटींवर जातं. प्रत्येक दिवशी मंदिरात प्रवेश दिल्या जाणाऱ्या भक्तांची संख्या मर्यादित करण्यात येऊनदेखील या आकडेवारीत फारसा फरक पडला नसल्याचं सांगितलं जातं. भक्तांची संख्या वाढवावी की नको, याबाबत निर्णय घेण्यासाठी मंदीर प्रशासनाची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यात सध्या तरी संख्या न वाढवण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना काळात भक्तांच्या संख्येवर मर्यादा असणं हीच बाब योग्य असून कोरोना संकट पूर्ण संपल्यानंतर त्याबाबत पुनर्विचार करता येईल, असंही विश्वस्त मंडळातील सूत्रांकडून समजतं आहे. हे वाचा - देशभरात मान्सूनला ब्रेक: अर्ध्या वाटेतच थांबले ढग, हे आहे कारण भाविकांची रिघ देशातील अनेक भांगात अंशतः लॉकडाऊन असूनही तिरुपतीला येणाऱ्या भाविकांचं प्रमाण मोठं असून कुठलंही बुकिंग न करता थेट येणाऱ्या भाविकांना सीमेवरूनच परत पाठवण्यात येत आहे. ज्यांनी बुकिंग करून वेळ घेतली आहे, केवळ अशाच नागरिकांना तिरुपतीत प्रवेश देण्यात येत आहे. तिरुपती देवस्थानाकडून दररोज 5000 भाविकांनाच तिकीटं जारी करण्यात येत असून हे प्रमाण सध्या तरी कायम ठेवण्यावर विश्वस्त मंडळ ठाम असल्याची माहिती मिळत आहे. 2020-21 या वर्षात 1300 कोटींच्या आसपास दानाची रक्कम जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचा फटका बसल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. गेल्या वर्षी दानातून 725 कोटी रुपये जमा होऊ शकले आहेत.
    Published by:desk news
    First published:

    पुढील बातम्या