• होम
  • व्हिडिओ
  • ट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख
  • ट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख

    News18 Lokmat | Published On: Jan 13, 2019 12:12 PM IST | Updated On: Jan 13, 2019 12:12 PM IST

    अमेरिका, 13 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच त्यांच्या वादग्रस्त कामकाजावरून चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे ट्विट्सही अनेक वेळा वादाचा विषय ठरतात. त्यांच्या अशाच वादग्रस्त ट्विट्सचा वापर करत अमेरिकेतील एका व्यावसायिकानं एका महिन्यात 20 लाख रुपये कमावले. लॉसएंजल्समधील 27 वर्षीय छायाचित्रकार आणि कलाकार सॅम मॉरिसन यांनी 2017 मधल्या ट्रम्पच्या सर्व विवादास्पद ट्विट्सचा वापर त्यांच्या नव्या फ्लिप फ्लॅॉप चपल्सवर प्रिंट म्हणून वापरला. सुरूवातीला मॉरिसनने 1000 जोड्या चप्पल तयार केल्या आणि त्या वेबसाईटवर विकायला ठेवल्या. वेबसाईटला नावंही PresidentFlipFlops.com असं ठेवलं. आणि महिना भराच्या आतच त्यांच्या सर्व हजार चपला विकल्या गेल्या आणि आता त्यांनी चपलांचं प्रॉडक्शनही वाढवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading