जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मारामारी करतात...

जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मारामारी करतात...

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून मोठा वाद निर्माण केलाय. या व्हिडिओमध्ये ते एका माणसाला मारताना दिसतायंत.

  • Share this:

3जुलै : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतात. आता ते पुन्हा एका वादात अडकलेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून मोठा वाद निर्माण केलाय.

आता या व्हिडिओत नक्की आहे तरी काय? हा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प ज्या काळात WWEमध्ये होते त्या काळातला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका माणसाला मारताना दिसतायंत.मात्र त्या माणसाच्या चेहऱ्याच्या जागी 'CNN'चा लोगो लावलाय.यामध्ये त्यांना नेमकं काय दाखवायाचंय हा एक मोठा प्रश्न आहे. कारण या आधीही ट्रम्प यांनी मीडियावर टीका केलीय. अनेक मुलाखतीत त्यांनी अँकर्सची अक्कलही काढलीय.

First published: July 3, 2017, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading