S M L

दहशतवाद विरोधी आर्थिक मदत मिळवताना पाकिस्तानने अमेरिकेला मूर्ख बनवलं - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''15 वर्षांत अमेरिकेनं पाकिस्तानला 33 बिलियन डॉलरची मदत केली आहे. परंतु पाकिस्ताननं या बदल्यात आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे. मात्र यापुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही.

Chandrakant Funde | Updated On: Jan 1, 2018 07:51 PM IST

दहशतवाद विरोधी आर्थिक मदत मिळवताना पाकिस्तानने अमेरिकेला मूर्ख बनवलं - डोनाल्ड ट्रम्प

1 जानेवारी, वॉशिग्टन : पाकिस्तानने आर्थिक मदत मिळवताना अमेरिकेला मुर्ख बनवल्याचं डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिकेनं गेल्या 15 वर्षात पाकिस्तानला तब्बल 33 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत केली पण त्या बदल्यात पाकिस्तानने दहशतवादी रोखण्याऐवजी उलट त्याला खतपाणीच घातल्याचं दिसतंय. त्यामुळे इथून पुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नसल्याचं डोनॉल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''15 वर्षांत अमेरिकेनं पाकिस्तानला 33 बिलियन डॉलरची मदत केली आहे. परंतु पाकिस्ताननं या बदल्यात आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे. मात्र यापुढे अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही. अमेरिकेनं पाकिस्तानला 2002पासून आतापर्यंत जवळपास 33 अब्ज डॉलर एवढी आर्थिक मदत केली आहे. तर ऑगस्ट 2017मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या 255 मिलियन डॉलरच्या मदतीवरही टाच आणली होती.

पाकिस्तान जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत पाकिस्तानला 25 कोटी 50 लाखांची मदत मिळणार नाही, असंही अमेरिकेनं ठणकावलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी कॅनेडियन दाम्पत्याच्या पाकिस्तानमधल्या तालिबान्यांनी केलेल्या अपहरणानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतले संबंध बिघडले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 07:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close