Home /News /news /

चीनच्या कुरापतींना अमेरिकाही वैतागली, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं आवाहन

चीनच्या कुरापतींना अमेरिकाही वैतागली, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं आवाहन

Washington: President Donald Trump talks to the media as he leaves the White House, Friday, Feb. 28, 2020 in Washington, on his way for a short stop at Andrews Air Force Base to board Air Force One for a campaign rally in North Charleston, S.C., for a campaign rally.AP/PTI(AP2_29_2020_000017B)

Washington: President Donald Trump talks to the media as he leaves the White House, Friday, Feb. 28, 2020 in Washington, on his way for a short stop at Andrews Air Force Base to board Air Force One for a campaign rally in North Charleston, S.C., for a campaign rally.AP/PTI(AP2_29_2020_000017B)

भारत-चीन सीमा विवाद सोडवण्यासाठी भारताच्या मदतीस अमेरिका सज्ज आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

    वॉशिंग्टन, 05 सप्टेंबर : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला भारत-चीन सीमा विवाद पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. वारंवार सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींमुळे अमेरिकासुद्धा वैतागली आहे. यामुळे भारत चीन सीमा विवादात (India China Border Dispute) आम्ही भारताला मदत करण्यासाठी तयार आहोत असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटलं आहे. भारत-चीन सीमा विवाद सोडवण्यासाठी भारताच्या मदतीस अमेरिका सज्ज आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, 'भारत-चीन सीमेवर तणाव खूप वाढला आहे. दोघांमध्ये खूप वाईट गोष्टी सुरू आहेत. या दोन्ही देशांच्या वादात मला मध्यस्थी करावी लागेल आणि मी ही समस्या सोडणवण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. मी जर काही करू शकलो तर मला मदत करायला आवडेल.' असंही अध्यक्ष ट्रम्प म्हणाले. इतकंच नाही तर आम्ही दोन्ही देशांशी वादाच्या मुद्यावर बोलत आहोत अशी माहिती व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी दिली. कोरोना लसीसाठी आला नवा Covax प्लॅन, 18 सप्टेंबर ही नोंदणीची शेवटची तारीख आम्ही चीन आणि भारताला मदत करण्यास तयार आहोतः ट्रम्प भारत आणि चीनच्या वादात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मदतीच्या विषयावर भाष्य केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि चीनच्या वादात आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला मदत करायला आवडेल. याबद्दल आम्ही दोन्ही देशांशी बोलत आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रेम प्रकरणातून घडली भयंकर घटना, भर रस्त्यातच पेटवून दिली रुग्णवाहिका चीन भारताला धमकवत आहे का? एका पत्रकाराने चीन भारताला धमकवत आहे का? असा प्रश्न विचारल असता 'असं होऊ नये अशी आमची आशा आहे. पण चीन नक्कीच या दिशेनं वाटचाल करत आहे. हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे' असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या