Home /News /news /

संपर्क ठरला धोकादायक, डोंबिवलीत एकाच दिवसात आढळले 12 रुग्ण!

संपर्क ठरला धोकादायक, डोंबिवलीत एकाच दिवसात आढळले 12 रुग्ण!

कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत चालली होती.

डोंबिवली, 18 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात रुग्णांची संख्या आटोक्यात आली असे चित्र असताना आज अचानक एकाच दिवसात 13 रुग्णांची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज कल्‍याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 13 रुग्ण आढळले आहे. यातील 12 रुग्ण हे डोंबिवली परिसरातील आहे तर एक रुग्ण कल्याणमधील आहे. यात  एका वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या 13 पैकी 9 जणांना रुग्णांचा सहवासातून लागण झाली आहे.  तर एक रुग्ण हा परदेश दौरा करून परतला आहे. हेही वाचा -20 तारखेपासून अतिरिक्त एसटी बसेस सुटणार, ही आहे संपूर्ण यादी! कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत चालली होती. दोनच दिवसांपूर्वी 20 जणांनी कोरोनावर मात करून घरी पोहोचले होते. परंतु, आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 13 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पालिका क्षेत्रात आता रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. यात 2 जणांचा मृत्यू जाला आहे. तर 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 45 रुग्णांवर उपचार सुरू आहे. हेही वाचा -50 घरांमध्ये दूध विकणाराच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, हजारो लोकांचे जीव धोक्यात दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री यांना ट्वीट करुन नव्याने मागणी केली आहे. डोंबिवलीत वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कल्याण डोंबिवली शहरांकरिता सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. पालिकेची परिस्थिती पाहता इथे दोन्ही शहरांकरीता PPP तत्वावर दवाखाना बांधण्याकरिता चांगल्या संस्थांना निमंत्रित करणे गरजेचे आहे, अशी विनंती पाटील यांनी केली. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या