मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली, आई-वडिलांचा वाचवला जीव

एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली, आई-वडिलांचा वाचवला जीव

 एकट्या मुलीने झुंज देवून आपल्या आई वडिलांची सुटका केल्याचा थरार घडला आहे.

एकट्या मुलीने झुंज देवून आपल्या आई वडिलांची सुटका केल्याचा थरार घडला आहे.

एकट्या मुलीने झुंज देवून आपल्या आई वडिलांची सुटका केल्याचा थरार घडला आहे.

डोंबिवली, 9 जानेवारी : डोंबिवलीमध्ये 4 दरोडेखोऱ्यांशी एकट्या मुलीने झुंज देवून आपल्या आई वडिलांची सुटका केल्याचा थरार घडला आहे. मुलगी जर वेळेत आली नसती आणि ती दरोडेखोरांशी जोरदार भिडली नसती तर घरात चोरी तर झाली असतीच पण तिच्या आई वडिलांच्या जीवाचे बरे वाईट देखील होऊ शकले असते.

डोंबिवली पश्चिमेकडील सुरजमणी इमारतीत अशोक गिरी हे पत्नी व मुलगी प्रतिक्षा सोबत राहतात. अशोक गिरी हे अपंग असून निवृत्त बँक अधिकारी आहेत. गिरी यांची पत्नी आणि मुलगी मंगळवारी 5 जानेवारीला संध्याकाळी 6 च्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्याचवेळेस 4 दरोडेखोर ज्यांनी आधीच अशोक गिरी यांच्या घराची रेकी केली होती आणि दरोड्याचा कट रचला होता ते अशोक गिरी यांच्या घरात शिरले आणि अशोक गिरी यांना काही कळण्याआधीच त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि गिरी यांनी काही गडबड करु नये याकरता दरोडेखोरांनी त्यांचे हात खुर्चीला बांधले.

त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवून दरोडोखोर गिरी यांच्या मुलीची आणि पत्नीची वाट पाहत बसले होते. कारण खूप शोधूनही दरोडेखोरांना काहीच हाती लागलं नव्हतं. इतक्यात त्यांची मुलगी घरात आली. दरोडेखोरांनी दरवाजातच तिला पकडून तिच्या तोंडाला पट्टी बांधून तिचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत या मुलीने आरडाओरडा करत दरोडेखोरांना जोरदार प्रतिकार केला. यात तिच्या पायाच्या अंगठ्याला इजा झाली. मात्र तिच्या आवाजाने आणि दरोडेखोरांशी होत असलेली झडप पाहून शेजारचे धावत आले. पण मुलीबरोबर झालेल्या झटापटीत चोरट्यांच्या हातातून पडलेला फोन मात्र मुलीच्या हातात लागला. या फोनवरून पोलिसांनी माग काढत ठाण्यातून एका आरोपीला अटक केली.

त्याने दिलेल्या माहितीनुसार अशोक गिरी यांच्या इमारतीत राहणाऱ्या दिनेश नावाच्या तरुणानेच या दरोड्याचा प्लान आखल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिनेश, चेतन आणि अब्दुलला या तिघांना अटक केली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बडणे,पोलीस नाईक कुरणे, पोलीस शिपाई कुंदन भांबरे, मनोज बडगुजर आणि भगवान सांगळे यांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.

चेतन रजनीकांत मुकवाणी ( 38, रा. ठाणे-रघुवीरनगर ), दिनेश जयस्वाल रावल ( 42,रा.डोंबिवली सुरजमनी इमारती ) आणि ठाकुर्ली येथील रिक्षाचालक ( 49 ) असे तिघा दरोडेखोऱ्यांची नावे असून विष्णूनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. तर या दरोड्यात एक महिला देखील सामिल होती.

घरात घुसलेल्या तिघांपैकी एकाने गिरी याच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. दरोडेखोर आपला जीव घेणार या भीतीने गिरी यांनी प्रतिकार केला नाही. मात्र त्यांची मुलगी प्रतीक्षा यांनी दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने ते पळाले. माझ्या मुलीने हिंमत दाखवली म्हणू मी आज जिवंत आहे, असं गिरी यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Crime news, Dombivali