डोंबिवली 21 जानेवारी : डोंबिवलीमध्ये रिक्षाचालकाच्या दादागिरिच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षाचालकांने मोटासायकलवाल्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतल्या शेलार नाक्यावर 20 जानेवारी रोजी 12 वाजताच्या सुमाऱ्यास रमेश झांगऱ्या, चंदया जमादार आणि रवी लगाडे या तीन रिक्षाचालकांनी दावडी गावाजवळ रस्त्याच्यामध्ये रिक्षा उभी केली होती. मोटरसायकस्वारावर आलेल्या प्रतीक गावडे, निलेश भुणे आणि बाली जयस्वाल यांनी रिक्षाचालकांना रस्त्याच्यामध्ये उभी केलेली रिक्षा बाजूला करण्यास सांगितले. याच गोष्टीचा रिक्षाचालकांना राग आला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तिन्ही रिक्षाचालकांनी मोटसायकलस्वारांमध्ये पुन्हा वाद घालण्यास सुरू केलं. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, रिक्षाचालकानं प्रतीक गावडे याची चाकूने हत्या केली.
इतर बातम्या - कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली
पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत तपास सुरू केला. तपासाच्या दरम्यान, त्यांनी रमेश झाग्र्या, चंदया जमादार, रवी लगडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि रामनगर पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रिक्षाचालक आणि मोटरसायकल वाल्याच्या वादात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी अवस्थेत आहे. त्या जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रदित गावडे आहे. तर निलेश भुणे आणि बाली जैस्वाल हे या हाणामारीमध्ये जखमीचे झाले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
इतर बातम्या - तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा