PHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी!

PHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी!

  • Share this:

श्वानप्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण त्या फक्त काही पुस्तकात वाचण्याच्या कहाण्या नसतात. जगात माणूस आणि कुत्र्यांच्या प्रेमाच्या असंख्य घटना घडत असतात. अशीच एक घटना आहे ब्राझीलची. सोशल मीडियावर सध्या ती तुफान व्हायरल होतेय. (प्रतिकात्मक फोटो )

हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती झालेल्या एका रुग्णासोबत त्याचे काही मित्रही आले. मात्र त्यांना बाहेरच थांबविण्यात आलं. आपला लाडका मित्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानं त्या सगळ्यांनी ती रात्र हॉस्पिटलसमोर जागून काढली. ते चार मित्र म्हणजे त्या पेशंटचे लाडके कुत्रे होते. त्यांच्या डोळ्यात आपल्या मित्राविषयीचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. (प्रतिकात्मक फोटो )

ही घटना ब्राझीलच्या एका हॉस्पिटलमधली आहे. या हॉस्पिटलची नर्स Cris Mamprim ने सोशल मीडियावर ही घटना सांगितली.

ही घटना ब्राझीलच्या एका हॉस्पिटलमधली आहे. या हॉस्पिटलची नर्स Cris Mamprim ने सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही घटना सांगितली.(प्रतिकात्मक फोटो )

ती आपल्या पोस्टमध्ये लिहिते, रात्री तीन वाजता एक बेघर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्या सोबत त्याचे चार मित्र होते. आपल्या मित्रांच्या काळजीने रात्रभर त्यांची होत असलेली घालमेल पाहून आमचं मन हेलावून गेलं.(प्रतिकात्मक फोटो )

तीन पुढे लिहितेय की Cesar या नावाचा हा माणूस कफल्लक आहे. दररोजच्या जेवणासाठीही त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. काहीच नसलेल्या या माणसाकडे मात्र एक अनोखी संपत्ती आहे. त्याच्याकडे जीवापाड प्रेम करणारे चार कुत्रे आहेत.

तीन पुढे लिहितेय की Cesar या नावाचा हा माणूस कफल्लक आहे. दररोजच्या जेवणासाठीही त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. काहीच नसलेल्या या माणसाकडे मात्र एक अनोखी संपत्ती आहे. त्याच्याकडे जीवापाड प्रेम करणारे चार कुत्रे आहेत.(प्रतिकात्मक फोटो )

या मुक्या दोस्तांचं प्रेम पाहून हॉस्पिटमधल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची दया आली. त्यांनी या मित्रांना आतमध्ये घेतलं. फक्त घेतलंच नाही तर त्यांना जेवणही दिलं.

या मुक्या दोस्तांचं प्रेम पाहून हॉस्पिटमधल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची दया आली. त्यांनी या मित्रांना आतमध्ये घेतलं. फक्त घेतलंच नाही तर त्यांना जेवणही दिलं.(प्रतिकात्मक फोटो )

Cesar ने त्यांना सांगितलं की या मित्रांना पोटभर जेवण मिळावं म्हणून तो अनेकदा उपाशी राहिला. तो त्यांची खूप काळजी घेत असे.

Cesar ने त्यांना सांगितलं की या मित्रांना पोटभर जेवण मिळावं म्हणून तो अनेकदा उपाशी राहिला. तो त्यांची खूप काळजी घेत असे. (प्रतिकात्मक फोटो )

त्या नर्स ही पोस्ट 80 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली. तर 22 हजार कॉमेंट त्यावर आल्या. या मित्रांची नेटकऱ्यांनीही भरभरुन कौतुक केलंय.

त्या नर्स ही पोस्ट 80 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली. तर 22 हजार कॉमेंट त्यावर आल्या. या मित्रांची नेटकऱ्यांनीही भरभरुन कौतुक केलंय. (प्रतिकात्मक फोटो )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 09:04 PM IST

ताज्या बातम्या