... नाहीतर सांगली महापालिकेच्या सभेत कुत्र्यांना सोडणार!

... नाहीतर सांगली महापालिकेच्या सभेत कुत्र्यांना सोडणार!

कुत्रा पाळायचा असेल तर 5 हजार फी द्यावी लागेल या प्रस्तावा विरूध्द सांगली महापालिकेवर नागरिकांनी श्वान मोर्चा काढला. प्रस्ताव रद्द केला नाही तर पालिकेच्या सभेत कुत्र्यांना सोडणार असा इशारा श्वान प्रेमिंनी दिलाय.

  • Share this:

सांगली,ता.18 एप्रिल: कुत्रा पाळायचा असेल तर 5 हजार फी द्यावी लागेल असा प्रस्ताव सांगली महापालिकेनं तयार केलाय. या विरूद्ध आज नागरिकांनी महापालिकेवर श्वान मोर्चा काढला. हा प्रस्ताव रद्द केला नाही तर पालिकेच्या सभेत कुत्र्यांना सोडू असा इशारा श्वान प्रेमिंनी दिलाय.

पाळीव कुत्र्यांना 5 हजारांचा कर लावण्याचा प्रस्ताव येत्या 20 एप्रिलच्या महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं महासभा जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल असं स्पष्टिकरण महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिलंय.

राज्यातील इतर मनपांमध्ये शंभर किंवा दोनशे रुपये कर असताना सांगलीत पाच हजार कर कशासाठी? असा सवाल श्वान मालक विचारत आहेत.

भटक्या आणि पाळीव कुत्र्याचे नागरिकांवर हल्ले वाढलेले आहेत. त्यामुळे भटके आणि पाळीव कुत्री यांचा फरक व्हावा, त्याच बरोबर या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्‍चित व्हावी या साठी हा निर्णय घेतला जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय.

शहरात सुमारे 20-25 हजाराहून अधिक संख्येने पाळीव कुत्री आहेत. यामुळे किमान 12 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा पालिकेचा अंदाज आहे. मात्र या अजब निर्णयामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 06:04 PM IST

ताज्या बातम्या