मोठ्या हॉटेल्समध्ये मटण म्हणून दिलं जातं कुत्र्यांचं मांस, FIR दाखल

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये बड्या आणि नामांकित हॉटेल्सवर आता हा आरोप झालाय

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 07:50 PM IST

मोठ्या हॉटेल्समध्ये मटण म्हणून दिलं जातं कुत्र्यांचं मांस, FIR दाखल

हॉटेल्समध्ये मटण म्हणून कुत्र्यांचं मांस दिल्याच्या आरोप अनेकदा होतो. पण कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये बड्या आणि नामांकित हॉटेल्सवर आता हा आरोप झालाय. कत्तलखाण्यांमध्ये कुत्र्यांचं मांस काढून ते मटण शॉप्स आणि हॉटेलमध्ये विकण्यात येतं असा आरोप करण्यात येतोय.

बंगळुरूतल्या VBHV अपार्टमेंटने तमिळनाडूतल्या एका एजन्सीला परिसरातले कुत्रे पकडण्याचं कंत्राट दिलं. त्यामुळे आता दावा करण्यात येतोय की हे कुत्रे कत्तलखाण्यात पाठवून तेच मांस विकण्यात येत असल्याचा आरोप होतोय.

बंगळुरूचे पशू कल्याण अधिकारी हरिश यांनीही याबाबत संशय व्यक्त केलाय. अशा प्रकारच्या तक्रारी याआधीही करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

शहरांतल्या अनेक भागांमध्ये कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचं अनेकदा दिसून आलंय. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने लोकांच्याही तक्रारी असतात. त्यातूनच त्यांना कुत्र्यांना हटविण्याची मागणी केली जाते.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून त्याची चौकशीही सुरू केलीय. ज्या भागात कुत्र्यांची संख्या कमी झालीय त्या भागातल्या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...