मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /स्मार्टवॉचच्या डेटावर पूर्णपणे विश्वास ठेवता? मग तज्ज्ञांनी सांगितलेले हे दुष्परिणाम वाचा

स्मार्टवॉचच्या डेटावर पूर्णपणे विश्वास ठेवता? मग तज्ज्ञांनी सांगितलेले हे दुष्परिणाम वाचा

स्मार्ट फोननंतर आजच्या तरुणांना स्मार्ट घड्याळांमध्ये जास्त रस आहे. जुन्या पिढीतील पारंपारिक मनगटी घड्याळांची जागा स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँडने घेतली आहे.

स्मार्ट फोननंतर आजच्या तरुणांना स्मार्ट घड्याळांमध्ये जास्त रस आहे. जुन्या पिढीतील पारंपारिक मनगटी घड्याळांची जागा स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँडने घेतली आहे.

स्मार्ट फोननंतर आजच्या तरुणांना स्मार्ट घड्याळांमध्ये जास्त रस आहे. जुन्या पिढीतील पारंपारिक मनगटी घड्याळांची जागा स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँडने घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या टेक कंपन्या बाजारात अनोखी उत्पादने आणत आहेत. स्मार्ट फोननंतर आजच्या तरुणांना स्मार्ट घड्याळांमध्ये जास्त रस आहे. जुन्या पिढीतील पारंपारिक मनगटी घड्याळांची जागा स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँडने घेतली आहे. ह्यांचे अनेक उपयोग आहेत. व्यायाम, धावणे, जॉगिंग करताना स्मार्टफोन ऐवजी या घड्याळाचा वापर फिटनेस ट्रॅकर म्हणून करता येतो.

या स्मार्ट वॉचेसमध्ये अनेकज प्रकारचे फीचर्स असतात. याद्वारे फोन कॉल केले जाऊ शकतात, ईमेल पाठवता येतात, मित्रांना GIF स्टिकर्स पाठवता येतात. रिस्टबँडमधील सेन्सरद्वारे आरोग्याचा पाठपुरावा करता येतो. मात्र हे स्मार्ट वॉचेस आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत आणि याचे दुष्परिणाम काय आहेत. याबद्दलही माहिती करून घेणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासाठी भात खावा की पोळी? तज्ज्ञांनी सांगितले काय असते जास्त फायदेशीर

आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आजच्या काळात अनेक लोक आपल्या फिटनेसबद्दल सतर्क राहण्यसाठी या वॉचेसचा वापर करतात. याद्वारे आपल्याला बर्न झालेल्या कॅलरी पाहणे, चालण्याच्या पावलांची मोजणी करणे, रक्तदाब तपासणे, झोपेची क्रिया मोजणे, हृदय गती किती आहे हे पाहतात येते. बहुतांश स्मार्टवॉचमध्ये आरोग्याशी संबंधित काही ना काही वैशिष्टय़े निश्चितच असतात. यामुळे लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात.

मात्र प्रत्येकवेळी या स्मार्ट वॉच कडून मिळालेली माहिती अचूक असतेच असे नाही. त्यामुळे कधीकधी यावर विश्वास ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. एसएल रहेजा हॉस्पिटल माहीम-फोर्टिस येथील सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. हरेश मेहता यांच्यामते, स्मार्ट वॉचेसवर 100% विश्वास ठेवणे चुकीचे आहे.

Aajtak.in शी बोलताना डॉ. हरेश मेहता म्हणाले, "स्मार्टवॉचला एक छोटा संगणक म्हणता येईल ज्यामध्ये अनेक कार्ये आहेत. आज बरेच लोक स्मार्टवॉच वापरत आहेत आणि प्राथमिक वैद्यकीय उपकरणे म्हणून त्यांचा वापर करत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते स्वतःच्या आरोग्याचा अंदाज घेत आहेत. स्मार्टवॉच हृदय गती आणि ईसीजी लय ओळखू शकतात, परंतु स्मार्टवॉच हृदयविकाराचा झटका ओळखेल असा दावा करता येणार नाही. स्मार्टवॉच फक्त तुमची अनियमित हृदयाची लय ओळखू शकते."

डॉ. हरेश पुढे म्हणाले, "तुमचे स्मार्ट घड्याळ एखाद्या चांगल्या कंपनीचे असल्यास आणि भारतीय नियामक प्राधिकरण सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) द्वारे मान्यताप्राप्त असल्यास ते ECG च्या 12 लीड्सपैकी एक योग्यरित्या सांगू शकते, परंतु तरीही तुम्ही तुमच्या हृदयावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, हे झटका ओळखू शकणार नाही. ते वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया म्हणजेच हृदय गती सांगू शकते परंतु त्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही."

डॉ. हरेश यांनी पुढे सांगितले, "कोरोनाच्या वेळी रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी अनेकांनी स्मार्टवॉचचाही वापर केला. अनेक प्रकरणांमध्ये मी पाहिले आहे की, ब्लड ऑक्सिजन मशीनच्या तुलनेत स्मार्टवॉच चुकीचे परिणाम देतात. फॉल डिटेक्शन सुरक्षेसाठी स्मार्टवॉच वापरा. म्हणजे जर तुम्ही पडलात किंवा तुमचा अपघात झाला तर ते तुमच्या आपत्कालीन संपर्कांना अलर्टसह नोटिफिकेशन पाठवेल. पण प्रत्येक घड्याळात ही सुविधा असतेच असे नाही.

Diet During Workout : या डाएट प्लॅनने पूर्ण होईल आकर्षक शरीराचे स्वप्न! वर्कआउटसोबत घ्या असा आहार

डॉ. हरेश यांनी पुढे असा सल्ला दिला की, "जर तुम्हाला स्मार्टवॉच वापरायचे असेल, तर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली करा. तुमच्या स्मार्टवॉचचा डेटा डॉक्टरांना मदत करू शकतो. तुम्ही केवळ वॉचच्या डेटावरच विसंबून राहिलात तर यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. मी असेही म्हणेन की जे स्मार्टवॉचचा डेटा पूर्णपणे खरा मानत आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. स्मार्टवॉच घाला पण त्याला प्राथमिक वैद्यकीय उपकरणे मानू नका. तुम्हाला काही अस्वस्थ वाटत असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना दाखवा. जर हृदयाची गती अचानक वाढली असेल, तर एकाच जागी बसून दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या."

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle