News18 Lokmat

PM नरेंद्र मोदी को गुस्सा कब आता है? त्यांच्या आयुष्यातील 5 रंजक गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 11:57 AM IST

PM नरेंद्र मोदी को गुस्सा कब आता है? त्यांच्या आयुष्यातील 5 रंजक गोष्टी

नवी दिल्ली, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता अक्षय कुमारशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ही मुलाखत खऱ्या अर्थानं वेगळी होती. नेहमी राजकीय आरोप – प्रत्यारोपांवर मुलाखतीमध्ये चर्चा होतात. पण, या मुलाखतीमध्ये मात्र नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील नवीन गोष्टींचा उलगडा झाला. नरेंद्र मोदींना काय आवडतं? त्यांना राग येतो का? राग आल्यानंतर नरेंद्र मोदी काय करतात? शिवाय, नरेंद्र मोदी खर्चासाठी आईला पैसे पाठवतात का? अशा एक ना अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यावेळी नरेंद्र मोदींच्या जीवनातील अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला. तसेच नवीन पैलु देखील समोर आले.


अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे -पंतप्रधान मोदी


काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

Loading...

- पंतप्रधान होण्याचा विचार देखील माझ्या मनात केव्हा आला नव्हता. कारण, मी साध्या कुटुंबात जन्माला आलो होतो. शिवाय, माझं आयुष्य देखील सामान्य माणसाप्रमाणे होतं. एका विशिष्ट पार्श्वभूमीतून आलेल्या माणसाला राजकीय उद्दीष्ट असतात. सामान्य माणूस त्याबद्दल विचार करत नाही. कदाचित मी एकादी नोकरी करत असतो.

- मला सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची होती. 1962च्या युद्धावेळी ज्यावेळी मेहसाणा येथून सैनिकांना घेऊन ट्रेन्स जात होत्या. त्यावेळी मला देखील आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावं असं वाटत होतं.

- माझे विरोधकांशी देखील चांगले आणि मैत्रीचे संबंध आहेत. कदाचित याचा राजकीय परिणाम होईल. पण, ममता बॅनर्जी मला बंगाली मिठाई पाठवतात. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मला मिठाई पाठवली. त्यानंतर त्यांनी देखील मिठाई पाठवायला सुरूवात केली.

- राग येणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण, मला लगेच राग येत नाही. मी कामामध्ये काटेकोर आहे. याचा अर्थ मला राग येतो असा होत नाही.

- निवृत्तीनंतर मी काय करणार याबद्दल मी काहीही विचार केला नाही. मी नेहमी नवीन जबाबदारी घेत आलो आहे. निवृत्तीनंतर देखील मी काहीतरी नवीन करेन.


VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...