उत्खननात सापडले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 2 अस्थिकलश, नागरिकांची मोठी गर्दी

1960 साली अस्थिकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन सापडले आहेत.

1960 साली अस्थिकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन सापडले आहेत.

  • Share this:
    चाळीसगाव, 22 जुलै : चाळीसगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं नूतनीकरण करताना उत्खननात डॉ. बाबासाहेब यांचे 2 अस्थिकलश मिळाले असून त्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. चाळीसगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी काम सुरू आहे. 22 जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली काँक्रीटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि असलेले 2 कलश सापडले आहेत. एका अस्थिकलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख आहे. यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले, की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की, 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि 9 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले. 10 डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते. हे ही वाचा-शेवटी एसटीनेच दिला आधार; पावसामुळे झालेल्या खोळंब्यातून अशी केली सुटका त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व 1960 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला. त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन सापडले आहेत. हे अस्थीकलश सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन जागेवर पुतळ्याखाली विधीवत पूजन करून संध्याकाळी 7 वाजता ठेवण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published: