आपण यांना पाहिलत का? रावेरमध्ये भाजप आमदाराविरुद्ध लागले फलक!

दोन्ही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांना लक्ष करणारे फलक अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 06:12 PM IST

आपण यांना पाहिलत का? रावेरमध्ये भाजप आमदाराविरुद्ध लागले फलक!

इमतियाज अहमद, रावेर 10 सप्टेंबर : राज्यातली विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याला आता काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. यावल-रावेर मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो.  दोन्ही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांना लक्ष करणारे फलक अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले आहेत. सध्या या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘आपण यांना पाहिलंत का?’ अशा आशयाचे हे फलक हे रावेर शहरातील नागझिरी पुलाच्या समोरच लावण्यात आले आहेत. प्रत्येक फलकावर विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांची छायाचित्रे आहेत. शिवाय त्यावर मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना विचारणा करणारा मजकूर आहे. सौजन्य म्हणून यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक असा उल्लेख फलकांवर करण्यात आलाय.

झालं ठरलं! काँग्रेसला बसणार हादरा, हा दिग्गज नेता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

एकदा निवडून येऊन दर्शन दुर्लभ झालेल्या अशा नेतृत्त्वाला पुन्हा निवडून द्याल का? असा सवाल देखील मतदारांना फलकाद्वारे करण्यात आलाय. या फलकांमुळे यावल-रावेर मतदारसंघातील इच्छुकांमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, हे फलक नेमके कोणी लावले, कशासाठी लावले, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकाराची सकाळी माहिती झाली. परंतु, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने रावेर ठाण्यात नोंद करण्यात आलेला नाही.

'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

काँग्रेसला हादरा बसणार

Loading...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. पाटील उद्या 11 सप्टेबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेसपक्षासाठी मोठा हादरा मानला जातोय. काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला होता. तर काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं असाही आरोप त्यांनी केला होता. उद्या गरवारे क्लबमध्ये हा कार्यक्रम होणार असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अनेक मान्यवर   उपस्थित राहणार आहेत. राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते आहेत. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे ते 4 वेळा आमदार होते. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्षे मंत्री म्हणून काम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...