मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा

मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा

मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत

मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत

मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत

पुणे, 05 आॅगस्ट : मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समन्वयकांची पुण्यात बैठक बोलावली होती. या परिषदेला आलेल्या लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. या परिषदेनंतर उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली.

यापुढे मराठा आंदोलन कसं पुढे न्यायचं याची चर्चा झाली. आरक्षणावर एवढी चर्चा का केली जाते हे कळत नाही. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असत तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सगळ्यांनी मराठ्याकडे आणि आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही अवस्था झालीये. मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. ज्यांना आरक्षण आहे त्यांचं आरक्षण काढा अस आमचं म्हणणं नाही, फक्त यांना आरक्षण द्या इतकीच माफक अपेक्षा आमची आहे. पण तीस वर्षे झाली अजून किती वाट बघायची ? असा सवाल उदयनराजेंनी केला.

30 वर्षे झाले तरी अजून आरक्षण चा काही निर्णय झाला नाही,नुसते आयोग आणि समित्या काढून काय होणार ?, इतर जातींना जसा न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम धनगर समाजाची आहे. राजकारण्यांचं खूप बरं चाललं आहे, कधी झोपडपट्टी भागांत राहणाऱ्यांचा विचार केला का?, शेतकऱ्यांचा विचार केला का? त्यामुळे येथील राज्यकर्त्यांना विनंती आहे की नक्षलवादासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी काय तो निर्णय घ्यावा. जर  स्वतःच्या हक्काकरता आवाज उठवला तर केसेस केल्या जातात.  अजून किती अंत बघायचा, जर आपल्या हक्काचं भेटत नसेल तर यातूनच माओवादी तयार होतात मग सरकार मराठा तरुण हे माओवादी होण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत करून सरकारला इशारा दिलाय.

इतर जातींना जस न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम धनगर समाजाची आहे. कारण नसताना न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवलं जात आहे. घटना लिहिणारे बाबासाहेब ही आपल्याप्रमाणे माणूस होते. मग स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर यावं लागत याला कारणीभूत कोण आहे. हेच सर्व लोक आहेत. लोकसंख्यानुसार आरक्षण देऊन टाकायला हवं अशी मागणीही उदयनराजेंनी केली.

उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

सोयीच्या राजकारणामुळे आजवर बळी गेले त्यांना कोण कारणीभूत आहे

जीव गेल्यावर पैसे दिले जातात पण त्यांच्या कुटुंबियांवर काय परिणाम होतो हे पाहिलं पाहिजे

स्वतःचा जीव देणारी व्यक्ती दुसऱ्याचा जीवही घेऊ शकते

जागतिक पातळीवर संयमाचा पुरस्कार देयचा तर तो आंदोलकांना द्याला हवा

न्याय मिळत नसेल उलत त्यांनाच दिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर स्प्रिंगप्रमाणे बाऊन्स होऊ शकतो

माजी सर्व नेत्यांना विनंती आहे लवकरात लवकर तोडगा काढावा

न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करता

मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत

First published:

Tags: Aurangabad, Maratha reservation, Parbhani, Parbhani news, Protest, Pune, Udayan raje bhosle, उदयनराजे भोसले