चेन्नई,ता.29 जुलै : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करूणानिधी यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. रक्तदाब खालावल्याने शनिवारी त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 94 वर्षांच्या करूणानिधी यांना मुत्रपींडाचा त्रासही होत आहे. आज सकाळपासून अनेक महत्वाच्या नेत्यांनी करूणानिधींच्या प्रकृतीची हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.के.स्टॅलिन यांना फोन करून करूणानिधींच्या प्रकृतींच्या तब्येतीची विचारपूस केली. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली. दरम्यान संध्याकाळी करूणानिधी यांच्या सर्व कुटूंबियांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं होतं. वय जास्त झाल्याने औषधोपचारही फारसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांच्या चिंता वाढल्या आहेत. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही हॉस्पिटलमध्ये जावून करूणानिधींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
चेन्नईत पावसाची रिपरिप असूनही डीएमकेच्या मुख्यालयाबाहेर आणि कावेरी हॉस्पिटलसमोर डीएमकेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर करूणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभर प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा...
प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन
VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी
पिकनिकला गेलेल्या युवकाचा अतिउत्साह त्याच्याच जीवावर बेतला
VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी