बहिण भावाला ओवाळत असतानाच घराच्या अंगणात 'बर्निग कार'चा थरार

भावाला ओवाळण्यासाठी बहिण भाऊबीजेसाठी भावाकडे आली होती. अख्ख कुटुंब आनंदात होतं, एकीकडे भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू असतानाच घराच्या अंगणात असलेल्या कारने पेट घेतला.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 07:28 PM IST

बहिण भावाला ओवाळत असतानाच घराच्या अंगणात 'बर्निग कार'चा थरार

शिवाजी गोरे 29 ऑक्टोंबर : दिवाळीच्या दिवसांमध्ये भाऊबिजेचं वेगळं महत्त्व असतं. भाऊ-बहिणीच्या नात्यातलं प्रेम वृद्धिंगत करणारे तो सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो. पण दापोलीतल्या एका कुटुबांवर भाऊबीजेच्या दिवशीच आनंदावर विरजण पडलं. ओवाळणीचा कार्यक्रम सुरू असतानाच घराच्या अंगणात असलेल्या कारने पेट घेतला आणि कार जळून खाक झाली. घटना घडली तेव्हा कारमध्ये सुदैवाने कुणीही नव्हतं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात ही घटना घडली. इथल्या रुपनगर या गजबजलेल्या अपार्टमेंटमध्ये भावाला ओवाळण्यासाठी  बहिण भाऊबीजेसाठी  भावाकडे आली होती. अख्ख कुटुंब आनंदात होतं, एकीकडे भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू असतानाच घराच्या अंगणात असलेल्या कारने पेट घेतला. नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. त्यामुळे आनंदात असलेल्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पण त्या कारमध्ये कुणी नव्हतं याचं समाधानही होतं.

भाजप-शिवसेनेत मतभेद, सत्तावाटपाची पहिलीच बैठक रद्द

कार ही मध्यमवर्गीयांसाठी मोठी गोष्ट असते. पै पै जमा करून लोक गाडी घेण्याचं स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करतात. त्यामुळे कार ही प्रत्येकाच्या भावनेचाही विषय असतो. सणाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात? काय म्हणाले संजय राऊत!

दापोली शहरातील रुपनगर या अपार्टंमेंटसमोर MH 04  BD 489  ही कार उभी होती. या उभ्या असलेल्या कारने पेट घेतल्याने बर्निग कार'चा थरार लोकांनी अनुभवला. ही कार जळत असतानाच शेजारी असलेल्या दुसऱ्या गाडीलाही आग लागली. त्यामुळे तीही गाडी पाहाता पाहता लोकांच्या डोळ्या समोर जळून खाक झाली.

Loading...

या अपार्टमेंटमध्ये 100 कुटुंब राहतात. त्याच्या समोरच किमान 50 वाहनं पार्क केलेली होती. त्यामुळे आग भडकली असती तर सर्वच वाहनांनी पेट घेतला असता. मात्र अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...