Diwali 2020 : ग्रीन फटाके ही संकल्पना नेमकी काय? कसं कमी करतात प्रदूषण

Diwali 2020 : ग्रीन फटाके ही संकल्पना नेमकी काय? कसं कमी करतात प्रदूषण

हे फटाके कुठेही मिळणार नाहीत तर अधिकृत परवाना असणाऱ्या दुकानांमधून घेता येणार आहेत. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीच नाही तर वायू प्रदूषण होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर: यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं संकट आहे. उत्साह आणि सण साजरा करण्याचा आनंद असला तरी तो आपण काही नियम पाळून यंदा करायला हवा. प्रदूषण टाळूनही खूप चांगल्या पद्धतीनं सण साजरे करता येतात. केवळ ध्वनी नाही तर हवेतील प्रदूषणानं कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्यानं जास्त सावध राहाणं गरजेचं आहे. दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ग्रीम फटाके वापरण्याचे निर्देश दिले.

नावाप्रमाणेच ग्रीन फटाके कमी प्रदूषण करणारे आहेत, जे दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारताच्या विषारी हवेच्या अनुषंगाने अगदी वापरण्यासाठी ठिक आहेत. तसे, आपण सहसा बाजारात फटाके खरेदी करण्यासाठी बाहेर जातो. पण हे फटाके कुठेही मिळणार नाहीत तर अधिकृत परवाना असणाऱ्या दुकानांमधून घेता येणार आहेत. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीच नाही तर वायू प्रदूषण होतं. दोन वर्षांपूर्वी याचं प्रमाणा अधिक वाढल्यानं सुप्रीम कोर्टात यासंदर्भात याचिका सादर करण्यात आली होती आणि कोर्टानं ग्रीन फटाके वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचा-तंदुरुस्त माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान गेल्या दोन दशकांपासून कमी का होतं?

ग्रीन फटाक्यांमुळे 50 टक्के प्रदूषणावर आळा बसला. आवाज देखील कमी असतो आणि सामान्य फटाक्यांपेक्षा वेगळे असतात. औद्योगिक संशोधन परिषदशी (सीएसआयआर) संबंधित नीरी या संस्थेने तयार केलेले फटाके अगदी पारंपारिक फटाक्यांसारखेच आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे प्रदूषण कमी होते. दिवाळीची मजा कमी होत नाही कारण हे ग्रीन फटाके दिसायला, जळायला आणि आवाजातही सामान्य फटाक्यांसारखेच आहेत.

ग्रीन फटाके किती पद्धतीचे असतात...

तीन पद्धतीचे ग्रीन फटाके बाजारत अधिकृत आणि लायसन असणाऱ्या फटाके दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. 1. सेफ वाटर रिलीजर 2. स्टार क्रॅकर 3. अरोमा क्रॅकर्स

बाजारात जे फटाके मिळतात ते उडवल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. अशा पद्धतीनं फटाकांची आतषबाजी करण्यापेक्षा ग्रीन फटाके केव्हाही उत्तम पर्याय. यामुळे प्रदूषण कमी होते. कोरोनाच्या या काळात प्रदूषण वाढलं तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढेल असाही तज्ज्ञांनी दावा केला आहे.

First published: November 2, 2020, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या