Diwali 2020 : लय भारी! तरुणानं तयार केला 40 तास जळणारा मातीचा दिवा

Diwali 2020 : लय भारी! तरुणानं तयार केला 40 तास जळणारा मातीचा दिवा

35 वर्षांपूर्वी पाहिलेला मातीचा दिवा पुन्हा एकदा शिल्पकारानं तयार केला आहे. नेमका कसा आहे आणि याची काय किंमत आहे जाणून घ्या.

  • Share this:

छत्तीसगड, 02 नोव्हेंबर : दीप किंवा दिवाळीला दिव्यांची आरास लावली जाते. कोणी तेलाचा तर कोणी मेणाचा दिवा लावतं. हे दीप साधारण 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 तास राहतात त्यावर त्यांना सतत तेल घालत राहावं लागतं किंवा ज्योत संपली की दिवा विझून जातो. पण छत्तीसगडमधील एका तरुणानं तब्बल 40 तास जळत राहिल असा मातीचा दिवा तयार केला आहे. या तरुणाला त्याच्या या शिल्पकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. कोरोना काळात त्याला या दिव्याच्या ऑनलाइन ऑर्डस देखील येत आहेत.

छत्तीसगडमधील कोंडागाव येथे राहणारा एक कारागीर अशोक चक्रधारी याने मातीचा दिवा तयार केला आहे. हा दिवा साधारण 24 ते 40 तास जळत राहातो. यासाठी तरुणाला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. अशोक चक्रधारी हे व्यवसायाने एक शिल्पकार आहेत आणि ते बर्‍याच वर्षांपासून तेच काम करत आहेत. अलीकडे, या तरुणानं असा मातीचा दिवा बनविला आहे, जो 24 ते 40 तास सतत जळत राहतो. यासाठी त्यांचा गौरवही झाला आहे. 35 वर्षांपूर्वी असाच दिवा पाहिला होता आणि हे लक्षात ठेवून त्याने हा दिवा बनवल्याचा दावा अशोकने केला आहे.

हे वाचा-तंदुरुस्त माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान गेल्या दोन दशकांपासून कमी का होतं?

त्यांनी तयार केलेली ही कलाकृती व्हायरल होताच अशोक यांना ऑर्डर येत आहे. कुशल कारागीर अशोक चक्रधारी यांना फोन करून दिव्याची मागणी करत आहेत. शिल्पकार अशोक चक्रधारी म्हणाले की, "मी हा दिवा 35 वर्षांपूर्वी एका ठिकाणी पाहिला होता आणि तो डोक्यात ठेवून तयार केला आहे. आता सध्या 50 ते 60 दिव्यांची ऑर्डर त्यांना मिळाली असून त्याची किंमत 200 ते 250 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: November 2, 2020, 8:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या