Diwali 2019: जाणून घ्या या दिवाळीला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू विकत घ्याव्यात

Diwali 2019: जाणून घ्या या दिवाळीला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू विकत घ्याव्यात

या दिवसांमध्ये खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुबेर आणि धन्वंतरीची कृपा तुमच्यावर राहते असेही मानले जाते.

  • Share this:

दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी सजवलं जातं. हा सण घरात आनंद घेऊन येतो. कुटूंब, मित्र आणि नातेवाईकांसोबत अविस्मरणीय क्षण घालवले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवसांमध्ये खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुबेर आणि धन्वंतरीची कृपा तुमच्यावर राहते असेही मानले जाते. यावेळी 27 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली पहाट आहे. या दिवशी घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये तुपाचे दिवे लावा आणि गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा. असं म्हटलं जातं की, या दिवशी पूजा केल्याने घरात सुख- समाधान नांदतं आणि नकारात्मकता दूर होते. यंदा दिवाळीला राशीनुसार कोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत ते पाहूया...

मेष- या राशीच्या लोकांनी पितळेची भांडी विकत घ्यावी. तसेच पार्टनरला भेटवस्तू द्यायची असेल तर चांदी किंवा पांढऱ्या धातूचा एखादा दागिना भेट म्हणून द्यावा.

वृषभ- या राशीच्या लोकांनी स्वयंपाक घरासाठी लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू विकत घ्यावा. याशिवाय लोखंडाच्या वस्तू दान केल्यानेही लाभ होईल.

मिथुन- या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या धातूचं श्री यंत्र किंवा गणपती घ्यावा. याशिवाय कांस्य भांडे खरेदी करणे देखील चांगले. पार्टनरसाठी पिवळ्या पुष्कराजची अंगठी विकत घेऊ शकता.

कर्क- सोनं किंवा चांदीच्या गोष्टी विकत घ्या. याशिवाय तांब्याच्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. जर तांब्याची भांडी दान करू इच्छिता तर त्या रिकाम्या देऊ नका. त्यात पाणी, दूध किंवा तुम्हाला जे आवडेल ते भांड्यात भरून दान करा.

सिंह- घरच्या देव्हाऱ्यासाठी सोन्याची किंवा पिवळ्या धातूची लक्ष्मी- विष्णुची मूर्ती खरेदी करा. तसेच पार्टनरसाठी सोनं किंवा पिवळ्या पुष्कराजचं लॉकेट विकत घेऊ शकता.

कन्या- चांदीची अशी एखादी गोष्ट जी तुम्ही दररोज वापरू शकता किंवा देव्हाऱ्यात त्याचा वापर होईल. तसेच तांब्याची कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता.

तुळ- घरच्या देव्हाऱ्यासाठी चांदीचं श्रीयंत्र आणि दक्षिणवर्ती शंख घ्या. तसेच जीवनसाथीसाठी बांगड्या विकत घेऊ शकता.

वृश्चिक- चांदीची एखादी गोष्ट विकत घ्या तसेच तांब किंवा पितळेपासून तयार केलेली गोष्ट दान करा. यासोबतच तुम्ही मिठाईही दान करू शकता.

धनु- तांब्यापासून तयार करण्यात आलेली एखादी गोष्ट विकत घ्या किंवा दान करा. याशिवाय चांदीचा एखादा दागिनाही विकत घेऊ शकता.

मकर- तांब्यापासून तयार करण्यात आलेली एखादी गोष्ट विकत घ्या. तसेच चांदीची एखादी गोष्ट दान करू शकता. याशिवाय पांढरे कपडे किंवा दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ दान केल्याने लाभ होऊ शकतो.

कुंभ- घरातील देव्हाऱ्यासाठी पांढऱ्या धातूची एखादी गोष्ट किंवा चांदीचा दिवा विकत घेऊ शकता. याशिवाय पार्टनरसाठी सोनं, माणिक किंवा पुष्कराजची अंगठी विकत घेऊ शकता.

मीन- तांब्यापासून तयार करण्यात आलेली एखादी गोष्ट विकत घेऊ शकता ज्याचा तुम्ही दररोज वापर करू शकता. जर शक्य झालं तर सोन्याची एखादी गोष्ट दान करा किंवा पितळेची एखादी गोष्ट दान करू शकता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट

या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी!

या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 07:10 AM IST

ताज्या बातम्या