औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : राज्यात सरकार फक्त शिवसेनेमुळेच बनू शकतं नाही तर सरकार बनुच शकत नाही असा आत्मविश्वास माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त करून दाखवला आहे. मग महाशिवआघाडी किंवा युतीचं सरकर असो शिवसेनाच फक्त सरकार बनवू शकते असं ठामपणे रावतेंनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपचे दरवाजे खुले झाले अशी राजकीय चर्चा सुरू आहे. एकाकडे भाजपशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं तर दुसरीकडे आता शिवसेनाही याच मतावर ठाम आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम आहे.
शिवसेना आणि महाआघाडी एकत्र येत सरकार स्थापन करण्याची चिन्ह असताना राजकीय घडामोडी मात्र काही वेगळंच सांगतात. शरद पवार - सोनिया गांधी भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याबद्दल विचारलं असता संजय राऊत यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पवार यांच्याकडे गेलो होतो, असं सांगितलं. सरकार स्थापनेबद्दल काँग्रेस -राष्ट्रवादीने अद्याप काहीच भूमिका जाहीर केलेली नाही, याबद्दल विचारलं असता, राऊत यांनी थेट प्रतिक्रिया द्यायचं टाळलं.
इतर बातम्या - 'नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते'
"शरद पवार यासंदर्भात काही बोलले असतील, तर त्यांना कसं काउंटर करायचं", असं ते म्हणाले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हे मात्र त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं. पवार यांनी सोनियांशी शिवसेनेविषयी चर्चा केली नसेल तरी मी त्यांना कसा प्रश्न विचारू? "सरकार स्थापनेची जबाबदारी आमची नाही. ज्यांची होती, ते जबाबदारीपासून पळून गेले. पण आम्हाला खात्री आहे, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू", असं राऊत म्हणाले होते.
शिवसेनेला धक्का?
शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाही याबाबत पवार यांनी कुठलंच थेट भाष्य करायचं टाळलं. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे आज महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस - राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे.
सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांनी दिली. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या - शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजप थाटणार मनसेसोबत संसार, नाशिकमध्ये झाली बैठक