Home /News /news /

Success: कोरोना काळातही 'तिनं' जिद्दीनं व्यवसाय केला उभा; जिद्दीच्या जोरावर गाठलं शिखर

Success: कोरोना काळातही 'तिनं' जिद्दीनं व्यवसाय केला उभा; जिद्दीच्या जोरावर गाठलं शिखर

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

हितेश यांचे वडिल पंकज सिंह अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात.

आजच्या युवा कौशल्य दिनानिमित्त दिव्याची ही यशोगाथा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.

    सध्याच्या कोरोना काळात बेरोजगारीची (unemployment) समस्या भेडसावत असल्यानं तरुणाईलाही निराशेनं ग्रासलं आहे. नोकऱ्यांची कमतरता, व्यवसायातील अनिश्चितता, अस्थिर वातावरण यामुळं तरुण पिढीही सैरभैर झाली आहे. आर्थिक संकटानं (Financial crisis) लोक खचले आहेत. अशावेळी वयानं लहान असूनही जिद्द आणि कष्टाच्या, कौशल्याच्या (Skill) जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहत कुटुंबाचाही आधार बनणाऱ्या दिव्या पेरीयासामी आचार्यसारख्या मुली प्रेरणादायी ठरत आहेत. आजच्या युवा कौशल्य दिनानिमित्त दिव्याची ही यशोगाथा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. युवरस्टोरी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारत सरकारनं गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर(Skill Development) भर दिला आहे. कौशल्य प्रशिक्षण देऊन तरुणाईला स्वयंरोजगारासाठी सज्ज करण्याचं उद्दिष्ट आहे. अशाच कौशल्य प्रशिक्षणाचा आधार मिळाल्यानं स्वतःच स्वप्न पूर्ण करणाऱ्या दिव्याची ही कहाणी आहे. मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या अवघ्या 17 वर्षांच्या दिव्याचं लहानपणापासून सौंदर्य क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न होतं; पण तिच्या घरी मात्र या गोष्टीला विरोध होता. तरीही दिव्यानं आपला हट्ट सोडला नाही. तिला ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा होता पण घरातून त्यासाठी सहकार्य मिळालं नाही. मात्र 2018 मध्ये सलाम बॉम्बे फाउंडेशन (Salam Bombay Foundation) या संस्थेच्या कौशल्य कार्यक्रमाचा तिला आधार मिळाला. त्यांच्या ब्युटी अँड वेलनेस (Beauty and Wellness) कार्यक्रमात सहभागी होत दिव्यानं ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं आणि नंतर घरीच आपलं छोटसं ‘दिव्याज ब्युटी पार्लर’(Divya’s Beauty Parlour) सुरू केलं; पण कोरोनामुळं (Corona Pandemic) तिचं पार्लर बंद पडलं. हे वाचा - कोरोनातही IT कंपन्या जोमात; Infosys आणि TCS नंतर Wipro ही खेळतेय पैशांमध्ये अशावेळी खचून न जाता दिव्यानं नविन मार्ग शोधला. या कामात तिला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला तो सलाम बॉम्बे फाउंडेशननं. संस्थेनं सुरू केलेल्या तळागाळातील युवांसाठी उद्योजकतेची संधी (Entrepreneurship Incubator for Grassroot Adolescents) या कार्यक्रमात तिनं भाग घेतला. याद्वारे 16 ते 20 वर्षे वयाच्या मुलांना स्वयंरोजगाराची संधी दिली जाते. या उपक्रमात दिव्यानं सध्याच्या काळात उपयुक्त ठरणारं आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेतलं. व्यवसायाचे बारकावे जाणून घेतले. इन्स्टाग्राम, फेसबुक याचा व्यवसायासाठी वापर कसा करून घ्यायचा हे तंत्र आत्मसात केलं. कॅनव्हासारखे (Canva) नवीन अॅप्स शिकून घेतले आणि ऑनलाइनचा मंत्र जपत नव्यानं आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आता ती सर्व आधुनिक तंत्रांचा वापर करून व्यवसाय करते. तिनं स्वतः केसाचं तेल (Hair oil) बनवलं असून त्याची जाहिरातही ती सोशल मीडियावर करते. आता तिच्या पार्लरचा बोर्ड तिच्या घराबाहेर अभिमानानं झळकतो आहे. घरच्यांचा विरोधही आता मावळला असून ते अभिमानानं आपल्या मुलीची कर्तृत्वगाथा इतरांना सांगत असतात. दिव्याला त्यांचाही आता मजबूत पाठिंबा मिळत आहे. पुढील काळात तिला पूर्णवेळ ब्युटीशियन म्हणून कारकीर्द करायची असून, स्वतःचा स्टुडिओ उभारायचा आहे. तिची जिद्द आणि धडपड बघता ती नक्की आपलं स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास वाटतो.
    First published:

    Tags: Startup Success Story

    पुढील बातम्या