16 सप्टेंबर : सिंधुदुर्गात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना धक्का देत जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी बराखस्त करण्यात आलीये. दत्ता सामंत यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि हुसेन दलवाईंमध्ये जाहीर वाद झाले होते. दलवाईंनी सिंधुदुर्गात पक्षाची बैठक घेतली होती. तर आम्हाला न सांगता बैठक कशी घेतला, असा आक्षेप नितेश राणेंनी घेतला होता. एवढंच नाहीतर नितेश राणेंनी दलवाईंची सभाही हायजॅक केली होती. या वादानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा