दानवेंनी केला जावयाचा राजकीय घात, हर्षवर्धन जाधवांनी सासऱ्यांवर केले गंभीर आरोप

'संजना यांना हाताशी धरून राव साहेब दानवे जाधव कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा घरोबा तोडून, घर फोडून संजना यांना कन्नड मधून भाजप चा आमदार बनवण्याचे षडयंत्र रावसाहेब करीत आहेत.'

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 31 डिसेंबर : महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झालीय. त्यानंतर आता पंचायत निवडणुका सुरू असून त्यात पाडापाडीच्या राजकारणाने वातावरण तापलंय. अनेक पंचायत समित्यांमध्ये स्थानिक राजकाण लक्षात घेऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकारणाला उत आलाय. कोणी कुणाला पाठिंबा दिला आणि कुणाला धोका दिला हे कळणही अवघड झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड पंचायत समितीमध्ये असलेले जावयाचं वर्चस्व सासऱ्यांनीच खालसा केलंय. राजकारणातली ही सासरे आणि जावयांची जोडी विख्यात असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सासरे असलेल्या दानवेंवर गंभीर आरोप केला आहेत.

कन्नड पंचायत समितीवर हर्षवर्धन जाधव यांचं वर्चस्व आहे. रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आपलं पॅनल उभं केलं होतं. पंचायत समितीच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे सदस्य फुटल्याने तिथे भाजपने सत्ता निर्माण झाली. त्यामुळे जाधवांना धक्का बसलाय. त्यामुळे त्यांच्या घरातच भांडण लागलंय. रावसाहेब दानवे यांनी आपल्या आघाडीचे सदस्य फोडले असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

राव साहेब दानवे यांच्या कन्या संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. जाधव पुढे म्हणाले, संजना यांना हाताशी धरून राव साहेब दानवे जाधव कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा घरोबा तोडून, घर फोडून संजना यांना कन्नड मधून भाजप चा आमदार बनवण्याचे षडयंत्र रावसाहेब करीत असल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केलाय. रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यास आपण तयार असल्याचंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading