कोल्हापूर महापालिकेत राडा, MIM च्या पदाधिकाऱ्याला अधिकाऱ्यांनीच दिला चोप

कोल्हापूर महापालिकेत राडा, MIM च्या पदाधिकाऱ्याला अधिकाऱ्यांनीच दिला चोप

शाहिद शेख असे चोप दिलेल्या व्यक्तीचे नाव असून तो एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता असल्याचे समजते.

  • Share this:

कोल्हापूर,10 जानेवारी: कोल्हापूर महापालिकेत राडा झाला असून पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच एमआयएमच्या एका पदाधिकाऱ्याला चोपल्याची माहिती मिळाली आहे.शाहिद शेख असे चोप दिलेल्या व्यक्तीचे नाव असून तो एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता असल्याचे समजते. शाहिद शेख याने घरकुल योजनेतील लाभ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांशी वाद घातला. वाद विकोपाला जाऊन अधिकाऱ्यांनी शाहिद शेख याला बेदम मारहाण केली. यात शाहिद शेख याला गंभीर दुखापत झाली असून याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू..

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राजकीय समिकरणं बदलली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वचं राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केलीय. बदलत्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभूमीवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झालीय.

पालिकेत महाविकास आघाडी सत्ता राखणार?

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी असला तरी आतापासूनचं मोर्चेबांधणी सुरूवात झाली आहे. भाजप ताराराणी आघाडी तसेच महाविकास आघाडीनं निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी सर्वचं राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र आत्तापासूनच सुरू झालं आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. महाविकास आघाडीत नुकतेचं कोल्हापूरला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करुन महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्ता राखणार का? की ताराराणी आघाडी म्हणजेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाडिक घराणं सत्ता खेचून आणणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पालिकेत कुणाचं किती आहे संख्याबळ?

कोल्हापूर महापालिकेत सध्या काँग्रेसचे 29 नगरसेवक आहे. तर राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहे. ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक आहेत. भाजपचे 14 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक पालिकेत आहेत. सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. तर भाजप आणि ताराराणी युतीनंही सत्ता मिळवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू केलं आहे.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठापणाला

आगामी काळात कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे राज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक या दोन्ही नेत्यांसाठी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार. त्यामुळं राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापुरात पुन्हा सत्ता राखण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर पालिकेवर युतीची सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यामुळं या दोन नेत्यांमध्ये कुणाची रणनिती कामी येणार आणि सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती येणार हे तर काळच ठरवले.

सत्ता परिवर्तनाचा फायदा होणार?

राज्यातील फडणवीस सरकार गेलं आणि आता उद्धव ठाकरे सरकार आलं आहे. त्यामुळं काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनाचा परिणाम दिसला. विदर्भातील पाच जिल्हा परिषदांवर महाविकास आघाडीनं झेंडा रोवला. धक्कादायक म्हणजे देवेंद्र फडवणीस यांच्या नागपूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळं सत्ता परिवर्तनाचा फायदा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 02:00 PM IST

ताज्या बातम्या