लष्करप्रमुख म्हणतात, 'लष्कराला नागरिकही घाबरले पाहिजेत'

लष्करप्रमुख म्हणतात, 'लष्कराला नागरिकही घाबरले पाहिजेत'

जर देशातल्या लोकांना घाबरवण्यासाठी लष्कराचा विचार केला गेला तर मग आपल्यात आणि पाकिस्तानमध्ये काय फरक राहील? एवढंच नाही तर लष्करी राजवटीची ती सुरुवात असेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

  • Share this:

29 मे : लष्कराची भीती जशी शत्रुला वाटायली हवी तशी ती देशातल्या लोकांनाही वाटायला पाहिजे असं वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केलंय. ते पीटीआयशी बोलत होते. शत्रुंबाबत केलेलं लष्करप्रमुखांचं वक्तव्य समजण्यासारखं आहे पण देशातल्या जनतेला भीती घालण्यावर मात्र वाद होतोय.

"दगडफेक करण्यापेक्षा गोळ्या झाडा, लष्कराचं काम सोपं होईल"

"लष्कराला शत्रूही घाबरले पाहिजेत आणि देशाचे नागरिकही"

आपल्या लष्करप्रमुखाचं पहिलं वाक्य समजण्यासारखं आहे पण दुसरं वाक्य वादग्रस्त होऊ शकतं. कारण जर देशातल्या लोकांना घाबरवण्यासाठी लष्कराचा विचार केला गेला तर मग आपल्यात आणि पाकिस्तानमध्ये काय फरक राहील? एवढंच नाही तर लष्करी राजवटीची ती सुरुवात असेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

बीपीन रावत यांचं वक्तव्य काश्मीरच्या सध्याच्या स्थितीवर आहे. लष्कराला सामोरं जावं लागत असलेली स्थिती समजण्यासारखी आहे. पण काश्मिरीही  देशाचे नागरीक आहेत हे विसरून चालणार नाही. जे कुणी शत्रु आहेत त्यांचा बिमोड झालाच पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की कायद्यापेक्षा लष्करावर आहे याची जाणीवरही विरोधक करून देतायत.

काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कर बिकट प्रसंगात सापडलंय. दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना मदत करणारे लोकंच लष्कराच्याविरोधात आहेत. त्यामुळे दगडफेक करणाऱ्यांवर गोळयाही झाडता येत नाहीत आणि त्यांचे दगडंही थांबत नाहीत अशी स्थिती आहे. पण लष्कराचं मनोधैर्य राखणं महत्वाचंच आहे.

देशाअंतर्गत शत्रुंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असायला हवी. आपल्याकडे बीएसएफ, सीआरपीएफ अशा अनेक पॅरा मिलिटरी फोर्सेसही आहेत. त्यांचाच वापर व्हायला हवा. देशभक्तीच्या उन्मादात हुकूमशाही वृत्ती बळावू शकते ह्याचा विसर ना विरोधकांना व्हावा ना सत्ताधाऱ्यांना....

First published: May 29, 2017, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading