दीपा करमाकर टोकियो ऑलिम्पिकला मुकणार?

गुडघ्याच्या दुखापतीमुळे दोहा येथे होत असलेल्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतून दीपा बाहेर, पदक जिंकण्याचे दीपाचे स्वप्न भंगले.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 06:33 PM IST

दीपा करमाकर टोकियो ऑलिम्पिकला मुकणार?

बाकु, 17 मार्च : भारताची आघाडीची जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करते. मात्र, सध्या दीपाला टोकियो 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला मुकावे लागण्याची शक्यता आहे. दीपा सध्या गुडघेदुखाीच्या त्रासाने त्रस्त आहे. त्यामुळे दीपाला दोहा येथे होत असलेल्या वर्ल्डकपमधूनही माघार घ्यावी लागली आणि वर्ल्डकपमध्ये पदक जिंकण्याचे दीपाचे स्वप्न भंगले. वर्ल्डकपच्या आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत दीपाला गुडघेदुखीचा त्रास झाला. त्रिपुराच्या या खेळाडूने व्हॉल्टच्या पात्रता फेरीत १४.४६६ आणि १४.१३३ गुणांची कमाई करून एकूण १४.२९९ गुणांसह अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, या स्पर्धेत पहिल्या फेरीत उडी मारल्यानंतर लगेचच तिला दुखापत जाणवू लागली त्यामुळे तिने या स्पर्धेतून लगेचच माघार घेतली.

ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकरिता दोन वर्ल्डकप जिंकणे महत्वाचे असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दीपाने कांस्यपदक जिंकले होते, त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपकडून दीपाला अपेक्षा होत्या. मात्र आता टोकियो ऑलिम्पिकचेही स्वप्न दीपाचे मुकणार की काय? असा प्रश्न भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनला पडला आहे. भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष रियाझ भाटी यांनी यासंबंधी माहिती देताना म्हटले की, ''आजच्या अंतिम फेरीपूर्वीच तिच्या गुडघ्याला त्रास जाणवत होता. व्हॉल्टच्या अंतिम फेरीतील पहिल्या प्रयत्नात तिला वेदना जाणवली. त्यामुळे दुसरा व्हॉल्ट तिने केला नाही. त्यामुळे या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले,'' अशी माहिती दिली. असे असले तरी, 13 ते 16 जूनपासून सुरु होणाऱ्या आशियाई स्पर्धेत तर 4 ते 13 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी करत ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करु शकते. मात्र, आत दीपाला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण रिओ ऑलिम्पिकनंतरच तिच्या या दुखापतीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग दोन वर्षे ती खेळापासून दूर होती. त्यामुळे जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेलादेखील तिला मुकावे लागले होते. त्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिने तुर्कीतील मर्सिनला झालेल्या फिग कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार पुनरागमनासह ऑलिम्पिकच्या आशा पुन्हा जागृत केल्या होत्या. मात्र, आता पुन्हा गुडघेदुखीमुळे दीपा किती काळ जिम्नॅस्टिक्सपासून दूर रहावे लागणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, दीपाच्या तब्येतीवर तिचे ऑलिम्पिकचे भवितव्य ठरणार आहे.


======================================================================================================================

VIDEO : स्फोट घडवून उध्वस्त केल्या वाळू माफियांच्या बोटी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2019 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...