मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

“चाहत्यांनी चिंता करु नये. त्यांची तब्येत स्थिर आहे. लवकरच ते घरी परततील.” असं आश्वासन सायरा बानो यांनी दिलं आहे.

“चाहत्यांनी चिंता करु नये. त्यांची तब्येत स्थिर आहे. लवकरच ते घरी परततील.” असं आश्वासन सायरा बानो यांनी दिलं आहे.

“चाहत्यांनी चिंता करु नये. त्यांची तब्येत स्थिर आहे. लवकरच ते घरी परततील.” असं आश्वासन सायरा बानो यांनी दिलं आहे.

    मुंबई 2 एप्रिल: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी दिलेल्या माहितीनुसार रुटिन चेकअपसाठी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी न्यूमोनिया झाल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Dilip Kumar Hospitalised) आता त्यांनी नव्वदी पार केली आहे. शिवाय सर्वत्र कोरोनाचा वावर आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप कुमार यांचे चाहते चिंतेत आहेत. परंतु “चाहत्यांनी चिंता करु नये. त्यांची तब्येत स्थिर आहे. लवकरच ते घरी परततील.” असं आश्वासन सायरा बानो यांनी दिलं आहे. शूटिंगवर जायला झाला होता उशीर; वैतागलेल्या 'Rock'नं हातांनी तोडला लोखंडी गेट  दिलीप कुमार हे भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली आहेत. आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांच नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेता आता 98 वर्षांचा झाला आहे. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते. त्यामुळं चाहते त्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना करत आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या