News18 Lokmat

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं प्राचार्याची आत्महत्या

दिलीप खडतरे यांनी आत्महत्या केलीये. सांगोल्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे ते प्राचार्य होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 10:10 PM IST

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं प्राचार्याची आत्महत्या

सुनील उंबरे, 21 मे : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं सांगोल्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यानं आत्महत्या केलीये. राजकारणातून प्राचार्याचा बळी घेण्यात आल्याचा आरोप झाल्यानं प्रकरणाचं गूढ वाढलंय.

खडतरे यांनी आत्महत्या केलीये. सांगोल्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे ते प्राचार्य होते. त्यांच्याच ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थिनींनी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.

हा प्रकार समजल्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. त्यानंतर दिलीप खडतरे गायब झाले. त्यांनी पंढरपूरच्या एका कॉलेजच्या इमारतीवून उडी मारुन आत्महत्या केली. कॉलेजच्या अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.

खडतरे यांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि विनयभंगाची तक्रार यात मोठी गुंतागुंत आहे. दिलीप खडतरे यांच्यावर झालेल्या आरोपांत किती तथ्य होतं याचा तपास होणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...