पंतप्रधान मोदींवरून पुन्हा बिघडले दिग्विजय सिंह यांचे बोल, म्हणाले...!

पंतप्रधान मोदींवरून पुन्हा बिघडले दिग्विजय सिंह यांचे बोल, म्हणाले...!

काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. दिग्विजय सिंह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत आहेत.

  • Share this:

मध्य प्रदेश, 27 एप्रिल : मध्य प्रदेशच्या भोपाळ लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांविषयी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका जाहीर सभेमध्ये ते म्हणाले की, 'आजकाल गुगलवर फेकू टाईप केलं तर कोणाचा फोटो येतो?' त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना देशाचे पंतप्रधान सगळ्यात खोटे आहेत. ते खूप खोटं बोलतात असं दिग्विजय सिंह म्हणाले.

काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. दिग्विजय सिंह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या प्रज्ञा सिंह ठाकुर या मैदानात आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे भोपाळ लोकसभा मतदार संघ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : जाहीर सभेत अमोल कोल्हेंनी सांगितलं शिवसेना सोडल्याचं खरं कारण...

लोकसभा निवडणुकीच्या या मौसमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्यव्य करणारे दिग्विजय सिंह हे काही पहिलेच नेता नाही आहेत. याआधीही ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते बदरुद्दीन अजमल यांनीही पंतप्रधानांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

बदरुद्दीन अजमल म्हणाले होते की, 'देशामध्ये मोदींविरोधात जितकी महाआघाडी आहे. त्यामध्ये मी असणार आहे. आम्ही सगळे मिळून पंतप्रधानांना देशातून हाकलून देऊ. काही नंतर मोदी चहाचं दुकान चालवतील आणि पकोडे विकतील'

राज ठाकरेंच्या आरोपावर भाजपने लावला मोदींचा 'हा' VIDEO

First published: April 27, 2019, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading