मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डिजिटल रुपया आता तुमच्या मोबाईलवर पाहा कसा वापरायचा?

डिजिटल रुपया आता तुमच्या मोबाईलवर पाहा कसा वापरायचा?

डिजिटल रुपया

डिजिटल रुपया

शहरात तर दुकान असेल किंवा पेट्रोल पंप, भाजी विक्रेता असेल किंवा रिक्षाचालक यांनाही पैसे मोबाईलवरून डिजिटल पद्धतीनं बहुतांशजण देतात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्याचं प्रमाण जसं वाढत आहे, तसे डिजिटल व्यवहार करण्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे. ग्रामीण भागामध्येही आता अनेकजण पैशांचे व्यवहार हे मोबाईलचा वापर करून डिजिटल पद्धतीनं करतात. शहरात तर दुकान असेल किंवा पेट्रोल पंप, भाजी विक्रेता असेल किंवा रिक्षाचालक यांनाही पैसे मोबाईलवरून डिजिटल पद्धतीनं बहुतांशजण देतात.

  याचाच अर्थ, खिशामध्ये पैसे घेऊन फिरणं, ही आता जवळपास भूतकाळातील गोष्ट झालीय. त्यातच आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली असून, किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल.

  खिशात रोख रक्कम घेऊन जाणं आता भूतकाळातील गोष्ट होईल. कारण आता आरबीआयनं 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली आहे. पण ते कसे वापरायचे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. चला तर, याबाबत जाणून घेऊया.

  यापूर्वी 1 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्रीय बँकेनं होलसेल व्यवहारांसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता, तर आता किरकोळ व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) लाँच केलं जात आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, आरबीआयनं म्हटलं आहे की, रिटेल डिजिटल रुपयाच्या पायलट प्रोजेक्ट दरम्यान, त्याच्या वितरण आणि वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. सुरुवातीला त्याचं रोलआउट निवडक ठिकाणी केलं जाईल.

  Digital Rupee चा तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? वाचा फायदे आणि तोटे

  ई-रुपी आणण्याचा उद्देश काय?

  सीबीडीसी हे केंद्रीय बँकेनं जारी केलेल्या चलनी नोटांचं डिजिटल स्वरूप आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्पात 2022-23 या आर्थिक वर्षापासून ब्लॉक चेनवर आधारित डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली होती. तसंच या पूर्वी मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं होतं की, चलनाचं विद्यमान स्वरूप बदलण्याऐवजी, आरबीआय डिजिटल रुपयाचे उद्दिष्ट डिजिटल चलनाला पूरक आणि वापरकर्त्यांना पेमेंटसाठी अतिरिक्त पर्याय देणं आहे.

  ई-रुपी तुम्हाला कसा वापरता येईल?

  आरबीआयनं या संदर्भात माहिती शेअर करताना सांगितलं होतं की, सीबीडीसी हे पेमेंटचं एक माध्यम असेल, जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांसाठी लीगल टेंडर म्हणजे कायदेशीरित्या वैध असेल. त्याचं मूल्य सेफ स्टोअरच्या लीगल टेंडर नोट (सध्याचं चलन) च्या बरोबरीचं असेल. देशात आरबीआयचं डिजिटल चलन (ई-रुपी) सुरू झाल्यानंतर, स्वतःजवळ रोख पैसे ठेवण्याची गरज फक्त कमीच होणार नाही, तर रोख पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही.

  बँकेची कामांचं आताच नियोजन करा, 14 दिवस बँक राहणार बंद

  ई-रुपी डिजिटल टोकनप्रमाणे काम करेल. एकंदरीत, सीबीडीसी हे आरबीआयद्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचं डिजिटल स्वरूप आहे. ते चलनाप्रमाणेच व्यवहारांसाठी वापरलं जाऊ शकतं. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ई-रुपयाचं वितरण बँकांमार्फत केलं जाईल.

  डिजिटल वॉलेटद्वारे व्यक्ती ते व्यक्ती किंवा व्यक्ती ते व्यापारी व्यवहार करता येतात. मोबाईल वॉलेटवरून डिजिटल रूपयाचे व्यवहार करता येतील. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून देखील पैसे देऊ शकता.

  ई-रुपीमुळे रोख पैसे वापरून व्यवहार करणं आणखी कमी होऊ शकतं, व यामुळे व्यवहारात पारदर्शकता येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ई-रुपी सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरेल. देशातील नागरिकांनी डिजिटल पेमेंट यंत्रणा स्वीकारली तशीच हे नवं चलनही ते स्वीकारतील असा विश्वास सरकारला वाटत आहे. नागरिक हा बदल स्वीकारतात का ते लवकरच कळेल.

  First published:

  Tags: Digital, Digital currency, Rbi, Rbi latest news