मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Life@25 : गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट बंधनकारक आहे का?

Life@25 : गाडीत मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट बंधनकारक आहे का?

कारमधील सीट बेल्ट्सबाबत नेमके काय नियम आणि कायदा आहे? कायद्यात याबाबत काय तरतूद, काय शिक्षा आहे?

कारमधील सीट बेल्ट्सबाबत नेमके काय नियम आणि कायदा आहे? कायद्यात याबाबत काय तरतूद, काय शिक्षा आहे?

कारमधील सीट बेल्ट्सबाबत नेमके काय नियम आणि कायदा आहे? कायद्यात याबाबत काय तरतूद, काय शिक्षा आहे?

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 07 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर कारमधील सीट बेल्टचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारच्या पुढील सीट्सवर ड्रायव्हरसह बसणाऱ्या प्रवाशाला सीट बेल्ट्स लावावा लागतोच. पण आता गाडी मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट बंधनकारक कऱण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कारमधील सीट बेल्ट्सबाबत नेमके काय नियम आणि कायदा आहे? कायद्यात याबाबत काय तरतूद, काय शिक्षा आहे? अ‍ॅड. सुजाता डाळींबकर, कायदेशीर सल्लागार - केंद्रीय मोटार वाहन नियम (1989) च्या कलम 138(3) मध्ये असे नमूद केले आहे की ज्या कारमध्ये नियम 125 किंवा नियम 125 च्या उप-नियम (1) किंवा उप-नियम (1-A) अंतर्गत सीट बेल्ट देण्यात आला आहे, त्या कारमध्ये ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. याशिवाय कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठी देखील सीट बेल्ट आवश्यक आहेत. हे वाचा - Life@25 : ड्रायव्हिंग शिकायचं आहे, स्वतःची गाडी घ्यायची आहे पण काय आहेत नियम? वाहतुकीच्या नियमांनुसार सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. यासोबतच हा सीट बेल्ट अपघाताच्या वेळी तुमचा जीव वाचवतो. मोटार वाहन कायदा, CMVR 177 MV कायद्याच्या कलम 138(3) मध्ये, सीट बेल्ट न लावण्यासाठी विशिष्ट दंड विहित केला आहे. मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 अंतर्गत सीटबेल्ट न लावल्याबद्दलचा दंड आता 100 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आला आहे.
First published:

Tags: Digital prime time, Law, Lifestyle

पुढील बातम्या