नागपुरात काँग्रेसमध्ये राडा, खुर्च्यांची फेकाफेक करत कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ 

नागपुरात काँग्रेसमध्ये राडा, खुर्च्यांची फेकाफेक करत कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ 

हा सगळा गोंधळ हा तानाजी वनवे यांच्या ऑफिसमध्येच सुरू होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकही केली. या गोंधळात तानाजी वनवे यांनी आपली खुर्ची घट्ट पकडून ठेवली होती.

  • Share this:

प्नशांत मोहिते, नागपूर18 नोव्हेंबर :  लोकसभेत काँग्रसला सपाटून मार खावा लागला. विधानसभेत थोडं यश मिळालं. मात्र पक्षातली बेदीली काही संपली नाही. उपराजधानी असलेल्या नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आलीय. नागपूर महानगरपालिकेत काँग्रेस विरोधीपक्षात आहे. तानाजी वनवे हे विरोधीपक्षनेते आहेत. वनवे यांच्या विरोधात युवक काँग्रेसनेच बंड पुकारलंय. वनवे हे कमकुवत असून त्यांना पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला.महापालिकेत काँग्रेस पक्षाचा विरोधीपक्ष नेता कमकुवत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचीच विंग असलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध आंदोलन करतानाही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होते. कार्यकर्त्यांनी चक्क विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची बळकाविण्याचा प्रयत्न केला. तसेच विरोधी पक्षनेते तानाजी वनवे मुर्दाबाद, बंटी शेळके जिंदाबाद च्या जोरदार घोषणा दिल्या.

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं जुळतानाच नरेंद्र मोदींनी केलं राष्ट्रवादीचं कौतुक

हा सगळा गोंधळ हा तानाजी वनवे यांच्या ऑफिसमध्येच सुरू होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकही केली. या गोंधळात तानाजी वनवे यांनी आपली खुर्ची घट्ट पकडून ठेवली होती. या गदारोळातच राज बोकडे यांची विरोध पक्ष नेते म्हणून निवड केल्याचंही कार्यकर्त्यांनी जाहीर केलं.

शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी! भाजपशी काडीमोड पण नव्या संसारातही कुरबुरी

नागपूर काँग्रेसमध्येच अनेक गट असून त्या गटांचं आपसात पटत नाही.  लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही या गटांच्या शितयुद्धात तिकीट वाटपावरूनही खेचा खेची झाली होती. त्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचं अनेकांनी नंतर स्पष्ट केलं होतं. शहरात कुठल्याही एका नेत्याकडे पक्षाचं नेतृत्व नसल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे बेदीली वाढली असून त्याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2019, 6:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading