पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या आजचे दर

पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या आजचे दर

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 71.29 नोंदवली आहे. तर डिझेलची किंमत 66.48 प्रति लीटर झालेली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रती लीटर 76.93 रू. झालेली आहे. तर डिझेलची किंमत 69.63 रू. प्रति लीटर नोंदवली गेलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार असं म्हणायला हरकत नाही.

पेट्रोल-डिझेलचे दर शुक्रवारी पुन्हा वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतमध्ये कालपेक्षा 13-14 पैशांनी वाढ झालेली आहे तर डिझेलची किंमत 15-16 पैशांनी वाढली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 76.93 रू. प्रति लीटर नोंदवली गेली तर डिझेलच्या किंमतीने उसळी मारत 69.63 रू. प्रति लीटरचा आकडा गाठलेला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 71.29 नोंदवली आहे. तर डिझेलची किंमत  66.48  प्रति लीटर झालेली आहे. या किंमती वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे पाहुयात...

- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढत आहेत.

- मागच्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये साधारणत: 8% वाढ झाली आहे.

- ब्रेंट क्रूडची किंमत गेल्या तीन महिन्यातील उच्चांकी म्हणजेच 64 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचलेली आहे.

- जगप्रसिध्द संशोधन कंपनी गोल्डमॅक्स सॅक्सने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, यावर्षी 2019 च्या सुरवातीलाच ओपेक देशांनी तेलाचे उत्पन्न कमी केलेले आहे.

मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर

पेट्रोल: 76.93  रू. प्रति लीटर

डिझेल: 69.63  रू. प्रति लीटर

दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर

पेट्रोल: 71.29 रू. प्रति लीटर

डिझेल: 66.48 रू. प्रति लीटर

Special Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'

First published: February 22, 2019, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading