Home /News /news /

तुम्हाला माहिती आहे का? वयानुसार तुमचं ब्लडप्रेशर किती असलं पाहिजे?

तुम्हाला माहिती आहे का? वयानुसार तुमचं ब्लडप्रेशर किती असलं पाहिजे?

आरोग्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं आवश्यक आहे. पुरुष, महिलांमध्ये वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं, याचा माहिती

आरोग्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं आवश्यक आहे. पुरुष, महिलांमध्ये वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं, याचा माहिती

आरोग्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं आवश्यक आहे. पुरुष, महिलांमध्ये वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं, याचा माहिती

    मुंबई, ०७ जुलै : अलीकडच्या काळात हृदयविकार (Heart Disease) असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हृदयविकार होण्यामागं अनेक कारणं असतात. त्यामध्ये प्रामुख्याने बदलती जीवनशैली, चुकीचा आणि अनियमित आहार, ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आदींचा समावेश असतो. हृदयाशी निगडीत समस्या असेल तर ब्लड प्रेशर (Blood Pressure) अर्थात रक्तदाबाची रेंज अत्यंत महत्त्वाची असते. वयपरत्वे ब्लड प्रेशरची रेंज वेगवेगळी असते; पण हृदयाशी निगडीत समस्या गंभीर होऊ नयेत, यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं आवश्यक आहे. 120/80mmHg ही ब्लड प्रेशरची सर्वसामान्य रेंज मानली जाते. यापेक्षा अधिक किंवा कमी रेंज असेल तर ते आजारांचे संकेत मानले जातात. वयापरत्वे (Agewise) ब्लड प्रेशरीची रेंज निश्चित केलेली असते. महिला, नवजात बालक, पुरुषांमध्ये ही रेंज वेगवेगळी असते. `जनसत्ता`ने याविषयीची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात 'डब्ल्यूएचओ'ने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 1.13 अब्ज लोक हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) या आजारानं ग्रस्त आहेत. आरोग्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं आवश्यक आहे. पुरुष, महिलांमध्ये वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं, याचा माहिती सर्वसामान्य लोकांना असणं आवश्यक आहे. 120/80 ही ब्लड प्रेशरची सामान्य रेंज (Range) मानली जाते. याचाच अर्थ तुमचं ब्लडप्रेशर या 120/80 दरम्यान असेल तर ते उत्तम मानलं जातं. एखाद्या प्रौढ व्यक्तीचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर (Systolic blood pressure) 95 ते 145 आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर (Diastolic blood pressure) 60 ते 90 दरम्यान असेल तर ते सामान्य मानलं जातं. परंतु, ब्लड प्रेशरची रेंज व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते. डॉक्टर अपवादात्मक स्थितीत रुग्णाची विशिष्ट शारीरिक स्थिती लक्षात घेऊन 145 ते 90 दरम्यान असलेली ब्लड प्रेशरची रेंजही सामान्य मानू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या 20 वर्षाच्या तरुणाला कोणताही आजार किंवा आजाराचं लक्षण नसेल तर त्याचं 90 ते 50 दरम्यान असलेलं ब्लड प्रेशर सामान्य मानलं जातं. वयापरत्वे आणि महिला, पुरुषांमध्ये ब्लड प्रेशरची रेंज वेगळी असती का असा प्रश्न नेहमी विचारला जातो. लहान वयात मुलगा असो अथवा मुलगी दोघांची ब्लड प्रेशरची रेंज जवळपास एकसारखीच असते. परंतु, वयात आल्यानंतर मुलं आणि मुलींची रेंज काहीशी वाढते. सर्वसाधारणपणे पुरुषांच्या (Men) तुलनेत महिलांच्या (Women) ब्लड प्रेशरची रेंज थोडी कमी असते. परंतु, मेनोपॉजनंतर महिलांचं ब्लड प्रेशर पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचं दिसून येतं. आता वयापरत्वे विचार केला तर नवजात ते सहा महिन्यापर्यंत वय असलेल्या बाळाची सामान्यपणे सिस्टॉलिक म्हणजे वरची ब्लड प्रेशर रेंज 45 ते 90 दरम्यान तर डायस्टॉलिक अर्थात खालची ब्लड प्रेशर रेंज 30 ते 65 असते. 6 महिने ते 2 वर्षाच्या वयोगटापर्यंत बाळाचं वरचं ब्लड प्रेशर 80 ते 100 आणि खालचं ब्लड प्रेशर 40 ते 70 सामान्य मानलं जातं. 2 ते 13 वर्ष वयोगटातल्या मुलांचं वरचं ब्लड प्रेशर 80 ते 120 तर खालचं ब्लड प्रेशर 40 ते 80 पर्यंत सामान्य समजलं जातं. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचं वरचं ब्लड प्रेशर 90 ते 120 तर खालचं ब्लड प्रेशर 50 ते 80 हे सामान्य असतं. 19 ते 40 वयोगटातल्या प्रौढ व्यक्तींचं वरचं ब्लड प्रेशर 90 ते 135 आणि खालचं ब्लड प्रेशर 60 ते 80 दरम्यान असेल तर ते नॉर्मल समजावं. 41 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींचं वरचं ब्लड प्रेशर 110 ते 145 आणि खालचं ब्लड प्रेशर 70 ते 90 असेल तर ते सामान्य असतं. वृद्ध व्यक्तींचं (Old Age) वरचं ब्लड प्रेशर 95 ते 145 तर खालचं ब्लड प्रेशर 70 ते 90 दरम्यान असेल तर नॉर्मल मानलं जातं. ब्लड प्रेशर वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सर्वसामान्यपणे ब्लड प्रेशरची रेंज ही वय, लिंग, अनुवंशिकता, वजन, व्यायाम, भावना, ताण-तणाव, गर्भधारणा, जीवनशैली आदींवर अवलंबून असते. तसेच वयासोबत ब्लड प्रेशरची रेंजही वाढत जाते. परंतु, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि ताण-तणावाचं व्यवस्थापन या प्राथमिक गोष्टी करणं आवश्यक आहे.
    First published:

    पुढील बातम्या