अजब आहे राव! कुत्र्यानं गिळला लाखोंचा हिरा आणि पोटातून निघाला सुई-धागा

अजब आहे राव! कुत्र्यानं गिळला लाखोंचा हिरा आणि पोटातून निघाला सुई-धागा

डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की कदाचित कुत्रा चमकणाऱ्याया गोष्टींकडे आकर्षित झाला असावा.

  • Share this:

पुणे, 30 जून : प्रत्येकाला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे हिरा. या हिऱ्यावर माणूसच नाही तर एक प्राणीही भुलला आहे आणि त्यानं चक्क हिरा गिळला. कुत्र्यानं हिरा गिळला हे ऐकूनच आधी अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

पुण्यातील हिरा व्यापाऱ्याच्या कुत्र्याने खेळताना लाखो रुपये किंमत असलेले दोन हिरे गिळले. त्यानं हिरे गिळल्यानंतर लोक घाबरून गेले. या घटनेनंतर हिरा व्यापारी तातडीनं कुत्राला दवाखान्यात घेऊन गेला.

रुग्णालयात श्वानावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करून हिरा बाहेर काढता येईल असं डॉक्टरांना वाटलं पण प्रत्यक्षात ऑपरेशन दरम्यान जे घडलं ते पाहून डॉक्टरांनाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कारण कुत्राच्या पोटातून दोन्ही हिरेच नव्हे तर एक सुई, कोटची दोन बटणे, रबर वायर आणि काही धागेही डॉक्टरांनी बाहेर काढले.

हे वाचा- पुत्रप्राप्तीसाठी महिलेसोबत अघोरी प्रकार, पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

डॉक्टरांचे म्हणणे आहे की या क्षणी कुत्रा ठीक आहे आणि हिरा व्यापाऱ्यांनी त्याला घरी परत आणले आहे. डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की कदाचित कुत्रा चमकणाऱ्याया गोष्टींकडे आकर्षित झाला असेल, म्हणून त्याने सुई, रबर आणि कोटचे बटण खाल्ले असेल.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 8:01 AM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading