रस्ते सुरक्षेसाठी DIAGEO नेटवर्क18सोबत (Network18)  घेऊन आलंय मोठा उपक्रम, तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत बऱ्याच योजना

रस्ते सुरक्षेसाठी DIAGEO नेटवर्क18सोबत (Network18)  घेऊन आलंय मोठा उपक्रम, तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत बऱ्याच योजना

४० टक्के मृत्यू हेल्मेट न वापरल्याने होतात तर ३० टक्के मृत्यू ओव्हर स्पीडमुळे होतात.’

  • Share this:

हल्ली आपण पाहतोय रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय. वाहन चालक रस्ते नियम पाळत नसल्याचं लक्षात येतंय. त्यासाठीच DIAGEO आणि नेटवर्क18 (Network18) यांनी मिळून एका उपक्रमाचं आयोजन केलंय. रस्ते नियम म्हणजे काय? रस्ते अपघातापासून कशी सुरक्षा करायची? DIAGEO म्हणजे काय, रस्ते नियम म्हणजे काय? यावर एक चर्चेचा कार्यक्रम झाला. यावेळी विनय करगावकर, अॅडिशनल डायरेक्टर ऑफ पोलीस ट्रॅफिक, महाराष्ट्र, सुब्रतो नीद, व्हाइस प्रेसिडंट आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ( पश्चिम), DIAGEO INDIA आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर उपस्थित होते.

रस्ते सुरक्षेबद्दल बोलताना अॅडिशनल डायरेक्टर ऑफ पोलीस ट्रॅफिक विनय करगावकर म्हणाले, ‘ लोक रहदारीचे नियम पाळत नाहीत. आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात १३,२६१ लोक मृत्युमुखी पडले. ८२ टक्के अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे होतात.’  ते पुढे म्हणाले, ‘ साधारण ३६ हजार अपघात वर्षभरात होतात. त्यात २० अपघात मोठ्या दुखापतीचे तर ११ हजार किरकोळ दुखापतीचे असतात.’

हे अपघात का होतात याबद्दल बोलताना विनय करगावकर म्हणाले, ‘कुठलंही वाहन चालवताना वाहतुकींच्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. ते न केल्यामुळे हे अपघात होत असतात.’ त्यांनी सांगितलं की ४० टक्के मृत्यू हेल्मेट न वापरल्याने होतात तर ३० टक्के मृत्यू ओव्हर स्पीडमुळे होतात.’

या सगळ्यासाठी रोड टु सेफ्टी हा उपक्रम DIAGEO नेटवर्क18शी मिळून राबवतेय. त्याबद्दल सांगताना व्हाइस प्रेसिडंट आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुब्रतो नीद म्हणाले, ‘ रोड नेटवर्कमध्ये ब्राझील चीननंतर भारताचा दुसरा नंबर लागतो. त्याचबरोबर रस्ते अपघाताचे प्रमाणही साडेबार टक्के आहे. त्याचा परिणाम आपल्या जीपीडीवर होत असतो.’

DIAGEO ही बेवरेज अल्कोहोल कंपनी आहे. काय आहे या कंपनीची मोहीम ? सुब्रतो म्हणाले, ‘ आमची मोहीम ५ वर्ष सुरू आहे. आमची प्राॅडक्टस कन्झ्युम कशी करायची, हे आम्ही लोकांना समजून देतो. यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, शैक्षणिक संस्था यांची आम्ही मदत घेतो.’ DIAGEO जबाबदारीचे ड्रिंकिंग ही संकल्पना राबवते.या कंपनीची जगभरात २० मार्केटस् आहेत.

सुब्रतो पुढे म्हणाले, ‘ युनायटेड नेशन ग्लोबल ग्लोज म्हणून कार्यक्रम आहे. त्याचे टाॅप २० क्रायटेरिया आहेत. त्यात वेगवेगळे विषय आहेत. या अंतर्गत रोड टु सेफ्टी हा कार्यक्रम आलाय.’ यामध्ये नक्की काय इश्युज हाताळले जातात. या कार्यक्रमाअंतर्गत १. लहान वयात दारू पिणे, दारू पिऊन गाडी चालवणे याविरोधात जनजागृती मोहीम केली जाते. २. ड्रंक अँड ड्राइव्हबद्दल सांगितलं जातं ३. प्राॅडक्टबद्दल योग्य माहिती देणे, किती प्रमाणात ते घ्यावं याबद्दलही सूचना दिल्या जातात. अनेक स्टेट एजन्सी यावर काम करत असतात. आता DIAGEO नेटवर्क18च्या सहकार्याने या योजना राबवत आहे.

सुब्रतोंनी सांगितलेल्या माहितीनुसार  DIAGEO आणि नेटवर्क18 यांनी  या उपक्रमाअंतर्गत कंपनीचे आयआयटी पार्टनर्स रस्ते सुरक्षेवर ऑडिट करतात. रस्ते सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल डिझाइन सजेशन देतात. शिवाय रस्ते अपघातामुळे लोकांवर वेगवेगळी आर्थिक ओझी येतात, त्यातून मार्ग कसा काढायचा हे सांगितले जाते. वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप, आरोग्यविषयक, अर्थकारणाबद्दल सगळं DIAGEO अंतर्गत येतं.

या उपक्रमात कलाकारांनाही सामील करून घेतलं जाणार आहे. याबद्दल अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली, ‘ कलाकारांनी याचे कँपेन केले तर लोकांवर जास्त चांगला परिणाम होईल. म्हणजे साध्या गोष्टी असतात, बाइक चालवताना हेल्मेट घातलंच पाहिजे, कारमध्ये तुम्ही सीटबेल्ट लावला नाहीत तर एअरबॅग्ज उघडणारच नाहीत.’

विनय करगावकर म्हणाले, ‘ रस्त्यावर अपघात दिसला तर थांबून मदत केली पाहिजे. १ तासात मदत मिळाली तर प्राण वाचू शकतात. आणि अपघात होऊ नये म्हणून नियमांचं पालन करा. दारू पिऊन कार चालवू नका. सुरक्षा तुमची तर आहेच, पण इतरांचीही आहे.’

जाता जाता अभिनेत्री स्मिताने चांगला उपदेश दिला. ती म्हणाली, सुरक्षित घरी पोचणं हा तुमचा चाॅइस हवा, चान्स नको.

DIAGEO नेटवर्क18च्या सहकार्याने सर्वसामान्यांना रस्ते सुरक्षेचे धडे देते. शिक्षण, अंमलबजावणी आणि इमर्जन्सी सर्विसेस हे  त्यांचं उद्दिष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 01:24 PM IST

ताज्या बातम्या