VIDEO : महापालिकेच्या प्रचारसभेत शिवसैनिकांमध्ये राडा

VIDEO : महापालिकेच्या प्रचारसभेत शिवसैनिकांमध्ये राडा

धुळे महानगरपालिकेत बुधवारी पार पडलेल्या प्रभाग क्रमांक 18 च्या प्रचारसभेमध्ये शिवसैनिक आपसात भिडले.

  • Share this:

धुळे, 5 डिसेंबर : धुळे महानगरपालिकेत बुधवारी पार पडलेल्या प्रभाग क्रमांक 18 च्या प्रचारसभेमध्ये शिवसैनिक आपसात भिडले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. पण त्यानंतर सभामंचावर शिवसैनिकांची हाणामारीच पाहायला मिळाली.

पालकमंत्री दादा भुसे हे प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. सभा संपल्यानंतर सभामंचावर शिवसैनिकांमध्ये वाद झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिसाने ही हाणामारी मिटवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो देखील असमर्थ ठरला. शेवटी नागरिकांनी हस्तक्षेप करत हा वाद आणि हाणामारी मिटवली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ पाहायला मिळाला.

शिवसैनिकांमध्ये ही आक्रमकता पाहून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सभेत बोलू दिले नाही म्हणून मद्यपींनी नशेत मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी काही शिवसैनिक धावले, मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इसमांनी तमा न बाळगता माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवसैनिकांनी मद्यधुंद इसमांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला

First published: December 5, 2018, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading