मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भयंकर आणि भीषण, मजुरांनी भरलेला डंपर ट्रकवर आदळला, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

भयंकर आणि भीषण, मजुरांनी भरलेला डंपर ट्रकवर आदळला, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

हा अपघात इतका भीषण होता की, डंपरचा समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, डंपरचा समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, डंपरचा समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे.

दिपक बोरसे, प्रतिनिधी धुळे, 14 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेले मजूर हजारो किलोमीटर पायपीट करून आपल्या गावाकडे निघाले आहे. काही करून गावाला पोहोचण्यासाठी निघालेले मजूर जीवघेणा प्रवास करत आहे. त्यामुळे अनेक मजुरांना गावी जाण्याचा प्रवास जीवावर बेतला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या डंपरला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा जवळ मजुरांनी भरलेल्या वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक प्रवासी मजुराचा मृत्यू झाला असून 20 मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर ठाण्याहून उत्तर प्रदेशाला आपल्या गावी जात होते. हेही वाचा -देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूवर उपासमारीची वेळ मध्यरात्री हा अपघात झाला. उभ्या असलेल्या एका ट्रकला मजुरांनी भरलेल्या डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरचा समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये प्रवासी वाहनांचे अपघात हे आता गेल्या एक आठवड्यापासून नित्याचे झाले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त मजुरांचा वाहतूक या वाहनांमध्ये केली जात आहे. विशेष म्हणजे मालवाहतूक वाहनांमध्ये मजुरांची वाहतूक होत असल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामध्ये जीवित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दोन भीषण अपघातात 18 मजूर ठार दरम्यान, घरी पायी चालत जाणाऱ्या 10 मजुरांना भरधाव बसनं बिहारमध्ये चिरडलं आहे. उत्तर प्रदेशातील गुणा इथे दुसरा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर जखमी आहेत. हेही वाचा -लुडोवरून झालं भांडण, 8 वर्षाच्या मुलानं बहिणीवरूद्ध पोलिसात केली तक्रार गुनाजवळ कंटेनर आणि पॅसेंजर बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जवळपास 55 प्रवासी मजूर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी असून महाराष्ट्रातून लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरी परतत होते अशी माहिती मिळाली आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या