VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

'घटनेच निमित्त करून मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये'

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 06:21 PM IST

VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

धुळे, 06 आॅगस्ट : खासदार डॉ.हिना गावीत यांच्या गाडीची झालेल्या तोडफोडीबद्दल मराठा क्रांती मोर्चाने जाहीर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान घडलेली घटना पूर्वनियोजित असल्याचा खासदार हिना गावीत यांचा आरोप चुकीचा आहे. खासदार हिना गावीत यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. डाॅ गावित यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे  कुठलाही हेतू नसून अनवधानाने हे घडलं असल्याच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलंय.

झालेली घटना ही निंदनीय असून मराठा कार्यकर्त्यानी केलेल्या या कृत्याचा मराठा क्रांती मोर्चा समर्थन करणार नाही असं स्पष्ट करतांना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान घटनेच निमित्त करून मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान,  मी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली. तसंच माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केला जातोय ही अत्यंत शर्मेची बाब आहे. पोलीस जर एखाद्या महिलेला सुरक्षा देऊ शकत नसेल तर तेथील पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणीही त्यांनी केली.

मी माझी बैठक संपून आपल्या कारने घरी जात होते  तेव्हा 200 ते 300 जणांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या गाडीवर चढून कारची काच फोडली. मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी माझ्या गाडीला घेराव घातला गेला होता तेव्हा तिथे फक्त चार पोलीस कर्मचारी होती. पण त्यांनी काहीही केलं नाही. फक्त पाहण्याची भूमिका घेतली होती. मी जर गाडीतून बाहेर पडली नसती तर माझा मृत्यूही झाला असता पण सुदैवाने माझ्या कार्यकर्त्यांनी मला बाहेर काढलं.

मी याबद्दल तक्रार केली तेव्हा फक्त 15 ते 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आलं. मी विचारला असता चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं अशी माहिती हिना गावित यांनी दिली.

Loading...

पण मी ज्या बैठकीसाठी गेले होते त्यावेळी तिथे अनेक इतर आमदार आणि इतर समाजाची लोकं होती. पण फक्त माझ्याच गाडीवर हल्ला झाला. मी आदिवासी समाजाची असल्यामुळे माझ्या गाडीवर हा हल्ला झाल्याय. त्यामुळे या प्रकरणीची अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी गावित यांनी केली.

ज्या व्यक्तीने हे कृत्य केलंय त्याला तर सोडून देण्यात आलंय. पण असं कृत्य केलं म्हणून त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्याची मिरवणूक काढण्यात आली अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली.

जर आमचे राज्याचे पोलीस महिलांचं संरक्षण करू शकत नसतील आणि एखाद्या गुन्हेगाराला संरक्षण देत असतील तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून तेथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावरही अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी गावित यांनी केली.

हेही वाचा...

माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करा -हिना गावित

VIDEO : गावितांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदूरबार बंद, आंदोलकांनी केली जाळपोळ

 

VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...