मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /धर्मा पाटील इफेक्ट : प्रशासन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणार

धर्मा पाटील इफेक्ट : प्रशासन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणार

धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर धुळे जिल्हा प्रशासनाने ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्याच्या वाढीव अनुदानाचा प्रस्ताव तयार केलाय.

    13 फेब्रुवारी, धुळे : धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर धुळे जिल्हा प्रशासनाने ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्याच्या वाढीव अनुदानाचा प्रस्ताव तयार केलाय. कोरडवाहू साठी हेक्टरी 10 लाख, बागायतीसाठी हेक्टरी 15 लाख रुपये निर्णय करण्यात आला होता. धर्मा पाटील यांच्यासह ज्या शेतकऱ्यांना या प्रमाणे पैसे मिळाले नसतील त्यांना वाढीव अनुदान दिले जाणार आहे. घोषित शासकीय अनुदान आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेलं अनुदान यात अनेक ठिकाणी तफावत आहे. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना तफावात रक्कम ही व्याजासह दिली जाणार आहे.

    याबाबतचा प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठवला असून हा प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे आल्यावर त्यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. धर्मा पाटील यांनी मंत्रालय परिसरातच किटकनाशक घेऊन आत्महत्या केल्यानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. धुळे ऊर्जा प्रकल्पात त्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली होती. पण त्यांना या जमिनीचा अतिशय कमी मोबदला मिळाला होता. म्हणूनच वाढीव नुकसानभरपाईसाठी ते मंत्रालयात खेटे मारत होते.

    First published:
    top videos

      Tags: Dharma patil effect