धुळे महापालिका : निकालांआधीच जिंकून आली 'ही' उमेदवार

धुळे महापालिका : निकालांआधीच जिंकून आली 'ही' उमेदवार

महापालिका निवडणुकांच्या या रणांगणात धुळ्यातून समाजवादी पक्षातून फातिमा अन्सारी या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

  • Share this:

धुळे, 10 डिसेंबर : महापालिका निवडणुकांच्या या रणांगणात धुळ्यातून समाजवादी पक्षातून फातिमा अन्सारी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भाजपने 6 जागांवर आघाडी मिळवली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या फौजिया अन्सारी बानो यांचं नामांकन सोमवारी (दि. २६) खंडपीठाने बहाल केलं होतं. पण त्याला समाजवादी पार्टीच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अन्सारी फातीमा नुरूल अमीन यांनी आव्हान दिलं होतं.

आपलं वय 19 वर्ष आहे हे फौजिया यांनी अर्जात लपवलं होतं. ही बाब फातिमा यांनी खंडपीठासमोर आणली. त्यामुळे खंडपीठाने फौजिया बानो यांची उमेदवारी रद्द केली होती.

तर धुळ्यात बंडखोर भाजप आमदार अनिल गोटे यांची पत्नी आणि मुलगादेखील धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अनिल गोटे यांच्या पत्नी या लोकसंग्राम पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवारही आहेत. त्यामुळे अनिल गोटे हे भाजपमधून बंडखोरी केल्यानंतर यश मिळवतात का, याची उत्सुकता आहे.

धुळे महानगरपालिकेच्या 73 जागांसाठी रविवारी मतदान झालं. थोड्याच वेळात या सर्व जागांचे निकाल जाहीर होतील. भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर गाजली आहे. आता  राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, अनिल गोटेंचा लोकसंग्राम पक्ष आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

धुळे महापालिकेसाठी ६० टक्के मतदान झालं होतं. अनिल गोटे यांनी केलेली बंडखोरी विरुद्ध भाजपच्या दिग्गज नेत्यांची हजेरी असं चित्र एकूणच प्रचारात होतं. धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झालं. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली होती. धुळे महापालिकेत एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.

या निवडणुकीत भाजप विरुद्ध सगळे पक्ष असा सामना बघायला मिळाला. बंडखोर आमदार  अनिल गोटे यांनी भाजप विरोधात वेगळी चूल मांडल्यानं मतविभाजनाची भीती भाजपला वाटत होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणुक लढवत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती.

आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाच्या बॅनर खाली स्वतंत्र चूल मांडल्याने गोटेंच्या भाजप विरोधाचा फायदा राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. गोटे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम असे सगळ्याच पक्षांनी भाजपला आव्हान दिलं होतं.

धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी   

356 उमेदवार रिंगणात होते. बंडखोरीची लागण सर्वच पक्षांना झाली असून ज्यांना तिकिट मिळालं नाही अशा अनेक नाराजांनीही दंड थोपटले आहेत.

'मैं हूँ डॉन...'वर थिरकले सुरेश धस,VIDEO व्हायरल

First published: December 10, 2018, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading