अरे देवा! ढिंच्यॅक पूजाने ‘या’ फोटोमध्ये लपवला आईचा चेहरा, जबरदस्त झाली ट्रोल

अरे देवा! ढिंच्यॅक पूजाने ‘या’ फोटोमध्ये लपवला आईचा चेहरा, जबरदस्त झाली ट्रोल

एका युझरने लिहिले की, ‘आईऐवजी स्वतःचा चेहरा लपवला असतास तर आम्हाला जास्त आनंद झाला असता.’

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे- इंटरनेट सेंसेशन ढिंच्यॅक पूजा तिच्या विचित्र गाण्यांनी नेहमी चर्चेत राहतेच. पण यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण थोडं वेगळं आहे. यावेळी पूजा तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा लाइम लाइटमध्ये आली आहे. या फोटोमध्ये पूजा एकटी नसून ती तिच्या आईसोबत आहे. याच कारणामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

पूजाच्या अधिकृत अकाउंटवर नेटकर अनेक वाईट करत आहेत. अनेकांना फक्त एकच प्रश्न पडला आहे की, पूजा असं कसं करू शकते... त्याचं झालं असं की, काल १२ मे रोजी दिल्लीत मतदान झालं. हात दिवस मदर्स डे म्हणूनही साजरा केला जातो. मतदान झाल्यानंतरचा एक फोटो पूजाने तिच्या अकाउंटवरून शेअर केला.

Kabir Singh Trailer- 'तेरे लिए कुछ भी कर सकता हूं... तेरे में मेरे जैसा पागलपन है तो...'KGF Chapter 2- यशचा सिनेमातील लुक लीक, सोशल मीडियावर याचीच चर्चा जास्त

या फोटोमध्ये तिच्यासोबत आईही होती. या फोटोला कॅप्शन देताना पूजाने लिहिले की, ‘आईसोबत मतदान केलं. नेहमीच मला पाठिंबा दिल्याबद्दल आई तुझे आभार... ’ या सगळ्यात पूजाने आपल्या आईचा फोटो इमोजीने झाकून टाकला आणि तो फोटो फेसबुकवर शेअर केला. याचमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलाच दम भरला. ढिंच्यॅक पूजाच्या या फोटोवर एका युझरने लिहिले की, ‘तुला आईचा फोटो दाखवायला लाज वाटते का? मातृदिनाच्या दिवशी तुझ्या या वृत्तीची आम्हाला कीव येते.’

सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे

तर दुसऱ्या एका युझरने तिला जगातील सर्वात मोठ मिम्स अशी उपमाच देऊन टाकली. तर अजून एका युझरने लिहिले की, ‘आईऐवजी स्वतःचा चेहरा लपवला असतास तर आम्हाला जास्त आनंद झाला असता.’ पूजा सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्या प्रत्येक गाण्यासाठी ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. काही दिवसांपूर्वी पूजा बोल्ड फोटोशूटमुळेही चर्चेत आली होती.

मिलिंद सोमणच्या 80 वर्षांच्या आईने मारले पुशअप्स, VIDEO VIRAL

VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार

First published: May 13, 2019, 3:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading