धायरी चिमुरडी अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक

धायरी चिमुरडी अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक

धायरीतल्या चिमुरडी अत्याचार आणि खून प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. या चिमुरडीचं राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिचा निर्घृण खून करण्याची धक्कादायक घटना धायरीत घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश मिळालंय. संशयित आरोपी बबलू हा २३ वर्षांचा असून पेंटर म्हणून काम करत होता.

  • Share this:

पुणे, 24 ऑक्टोबर : धायरीतल्या चिमुरडी अत्याचार आणि खून प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. या चिमुरडीचं राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिचा निर्घृण खून करण्याची धक्कादायक घटना धायरीत घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश मिळालंय. संशयित आरोपी बबलू हा २३ वर्षांचा असून पेंटर म्हणून काम करत होता. तो बालिकेच्या घराजवळच त्याच्या मित्रांना भेटायला यायचा. भाऊबीजेच्या रात्री रविवारी तो मित्रांकडे गेला होता तिथे त्यानं दारू प्याली आणि मुलीच्या घराचा दरवाजा उघडून मुलीचं अपहरण केलं. घरापासून १०० मीटर अंतरावरच्या शेतातच त्याने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिचा गळा दाबून निर्घृण खून केला.

भाऊबीजेच्या रात्री १२ ते पहाटे 3 च्या सुमारास ही घटना घडली होती. रात्री जाग आल्यानंतर आईने मुलीचा शोध घेतला असता ती गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रात्रीच सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या आरोपीला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी दुसरीकडे जाऊन झोपला आणि साताऱ्याला गेला होता. पुणे गुन्हे पोलिसांची चार पथकं या प्रकरणात तपास करत होती. आरोपीवर कलम ३०२, ३७६, ३६४ तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४ आणि ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: October 24, 2017, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading